Sangli Vulture Rescue : शेकडो किलोमीटरचा प्रवास करत सांगलीत कसं पोहोचलं दुर्मीळ गिधाड? पाठीवर आढळला 'ट्रॅकर' अन् पायात दिसला 'टॅग', वनविभागाचे उपचार सुरू

Rare Satellite-Tagged Vulture Rescued in Sangli : सांगलीतील मिरजजवळ थकलेल्या अवस्थेत आढळलेल्या सॅटेलाईट ट्रॅकर बसवलेल्या दुर्मीळ गिधाडाला वनविभागाने रेस्क्यू केले. घारी-कावळ्यांच्या हल्ल्यापासून बचावलेल्या या गिधाडावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
Satellite tagged vulture found in Sangli

Satellite tagged vulture found in Sangli

esakal

Updated on: 

सांगली : पुरेसे अन्न न मिळाल्याने अस्वस्थ झालेला आणि घारी-कावळ्यांच्या हल्ल्यापासून बचावासाठी द्राक्षबागेत उतरलेल्या एका दुर्मीळ गिधाडाला आज वनविभागाने उपचारांसाठी ताब्यात (Kites and Crows Attack Rare Vulture in Vineyard) घेतले. प्राथमिक माहितीनुसार, दक्षिण भारतातील एका वनविभागाकडून ‘सॅटेलाईट ट्रॅकर’ बसवून मुक्त विहारासाठी सोडलेले हे गिधाड आहे. सध्या त्याच्यावर सांगलीत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. पर्यावरणाचा हा ‘नैसर्गिक स्वच्छतादूत’ जगण्यासाठी करत असलेली धडपड पाहून वनविभागाचे अधिकारी आणि प्राणिमित्रही अस्वस्थ झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Yellow Wagtail bird deaths in Maharashtra
Namakwa Dove spotted in Raigad district
Neelkanth Bird
Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli