
कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा डिसेंबरलाच नविन बेदाण्याची आवक झाली. आजच्या सौद्यात विनायक हिंगमिरे यांच्या गणेश ट्रेडिंग दुकानात राजेंद्र सदाशिव उमरे (कुमठे) यांच्या 23 बॉक्स बेदाण्याला 161 रुपये प्रति किलो असा चांगला दर मिळाला. आजच्या सौद्यात 32 दुकानात तब्बल सातशे टन बेदाण्याची आवक झाली होती.
सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा डिसेंबरलाच नविन बेदाण्याची आवक झाली. आजच्या सौद्यात विनायक हिंगमिरे यांच्या गणेश ट्रेडिंग दुकानात राजेंद्र सदाशिव उमरे (कुमठे) यांच्या 23 बॉक्स बेदाण्याला 161 रुपये प्रति किलो असा चांगला दर मिळाला. आजच्या सौद्यात 32 दुकानात तब्बल सातशे टन बेदाण्याची आवक झाली होती.
यंदा नविन बेदाणा आवक फेब्रुवारी-मार्चमध्ये येईल म्हणून दर दिवाळीनंतर सुरू असलेल्या सौद्यात बेदाण्याचे दर वाढले होते. तसेच आवक देखील विक्रमी होती. परंतू आजच्या सौद्यात कुमठे येथील सदाशिव उमरे यांनी गणेश ट्रेडिंग या दुकानात 30 बॉक्स नवीन बेदाणा आणला. नविन बेदाण्यामुळे व्यापारी आणि शेतकरी यांच्यात उत्साह दिसला. त्यांचा 23 बॉक्स साधारण लांब बेदाणा राजयोग ओहर्सेसचे योगेश कबाडे यांनी 161 रुपये प्रतिकिलो दराने खरेदी केला. त्याच दुकानात 220 रुपये इतका उच्चांकी दरानेही बेदाणा सौदा झाला. तर अन्य दुकानात आज 236 रूपये प्रति किलो असा जुन्या बेदाण्याला उच्चांकी दर मिळाला.
दरम्यान, आज गणेश ट्रेडिंग या दुकानात नवीन सौद्यास बेदाणा व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष मनोज मालू, अध्यक्ष राजेंद्र कुंभार यांच्या हस्ते प्रारंभ झाला. पप्पू मजलेकर, कुमार दरूरे, गुलशन अग्रवाल, विनायक हिंगमिरे, आप्पासो आरवाडे, निर्मल रुणवाल, रविकुमार हजारे, योगेश कबाडे, नितीन मर्दा, हिरेन पटेल, सचिन चौगुले, परेश मालू, पवन चौगुले, विनोद कबाडे, दिगंबर यादव, अभिजित पाटील, अरुण शेडबाळे, रुपेश पारेख, मनीष मालू, हरीश पाटील, नितीन अटल, आरिफ कच्छी, सोमनाथ मनोळी, कांतीभाई पटेल उपस्थित होते.
बेदाणा दर असा
सध्या काळा बेदाणा 30 ते 60 रुपये किलो, साधारण लांब बेदाणा 80 ते 150 रुपये किलो, गोल ऍव्हरेज बेदाणा 100 ते 150 रूपये, उत्कृष्ट व उच्च प्रतीचा गोल बेदाणा 160 ते 250 रुपये किलो दराने भाव मिळत आहे. सांगलीतील सौद्यात बेदाण्यास चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती दिनकर पाटील यांनी केले.
संपादन : प्रफुल्ल सुतार