
Reliance Jewels robbery Sangli : दोन वर्षांपूर्वी येथील मार्केट यार्ड परिसरात रिलायन्स ज्वेल्स दरोडा प्रकरणातील संशयित प्रिन्सकुमार शिवनाथ सिंग (वय २७, तानापूर, दिलावरपूर, जि. वैशाली, रा. बिहार) याला विश्रामबाग पोलिसांनी शनिवारी अटक केली. डेहराडून कारागृहातून त्याचा ताबा घेत ही कारवाई करण्यात आली. गुन्ह्यावेळी दुचाकी पुरवण्यात त्याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत दरोड्यातील सहा संशयितांना ताब्यात घेतले असून, अद्याप मुद्देमाल जप्त करण्यात आलेला नाही. प्रिन्सकुमार याच्याकडे आता कसून चौकशी केली जाणार असल्याचे विश्रामबागचे पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी सांगितले.