Sangli Road Accident : ड्यूटी संपली, भूक लागल्याने नाश्ता शोधायला निघाले अन्...; सांगलीत उड्डाणपुलावर भीषण अपघात, कारच्या धडकेत 24 वर्षीय डॉक्टर तरुणीचा दुर्दैवी अंत

Sangli doctor road accident latest news : सांगलीतील विश्रामबाग रेल्वे उड्डाणपुलावर कारने दुचाकीला धडक दिल्याने २४ वर्षीय डॉक्टर खुशी मुंदडा यांचा मृत्यू झाला. सहकारी डॉक्टर योगेश लढ्ढा जखमी झाले असून पोलिस तपास सुरू आहे.
Young MBBS doctor killed in Sangli

Young MBBS doctor killed in Sangli

esakal

Updated on

सांगली : विश्रामबाग रेल्वे उड्डाणपुलावर चारचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार डॉक्टर तरुणी ठार झाली. डॉ. खुशी पवन मुंदडा (वय २४, नागपूर) असे त्या तरुणीचे नाव आहे. डॉ. योगेश संतोष लढ्ढा (वय २७, सिव्हिल हॉस्पिटल होस्टेल, मूळ वाशिम) हा जखमी झाला (Vishrambag railway flyover accident) आहे. मध्यरात्रीनंतर पावणे दोनच्या सुमारास भूक लागल्यामुळे नाश्ता सेंटर शोधायला जाताना हा अपघात झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com