
सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आज झालेल्या सौद्यात चालू हंगामातील बेदाण्याला प्रतिकिलो उच्चांकी ३७१ रुपये असा भाव मिळाला. विजयकुमार आमगोंडा पाटील यांच्या दुकानात भाग्यश्री एंटरप्राइजेस यांनी हिरवा बेदाणा खरेदी केला. यंदा नवीन बेदाणा हंगाम लवकर सुरू झाला आहे. होळी व रमजानच्या मुहुर्तावर बेदाणा खरेदीसाठी व्यापारी मोठ्या प्रमाणात सांगली बाजार समितीत दाखल झाले आहेत.