Sangli Wife Killed
esakal
शांतिनगर, सांगली येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा खून केला.
खूनानंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन कबुली दिली.
सलग दुसऱ्या दिवशी सांगलीत खूनाची घटना घडल्याने खळबळ उडाली.
सांगली : शहरातील शांतिनगर येथे कौटुंबिक वादात चाकूने गळा चिरून पत्नीचा खून (Sangli Wife Killed) करण्यात आला. काल सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. काजल प्रशांत एडके (वय २८, शांतिनगर, सांगली) असे मृत महिलेचे नाव आहे. संशयित पती पोलिसांत हजर झाला आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. प्रशांत एडके (वय ३५) असे संशयिताचे नाव आहे. दरम्यान, महापालिका क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशी खून झाल्याने खळबळ उडाली.