Father Accused of Abusing Daughter : पलूस हादरलं! 'जन्मदात्याकडूनच मुलीवर अत्याचार'; नात्याला काळिमा फसणारी घटना, आईची पोलिस ठाण्यात फिर्याद
Father Abuses Own Daughter : १९ एप्रिल रोजी रात्री १० वाजलेनंतर व त्यानंतर दोनवेळ १ मेपर्यंत संशयित आरोपी याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलगी आपल्या आजीजवळ झोपली असताना, तिला दुसऱ्या खोलीत नेऊन, जवळ झोपण्यास घेऊन, दमदाटी करून लैंगिक अत्याचार केले.
पलूस : तालुक्यातील एका गावात शेतमजुराने आपल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने पलूस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.