

Molestation Case Filed Against ST Accounts Officer in Sangli
सांगली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) सांगली विभागातील एका महिला कर्मचाऱ्याचा मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवून विनयभंग केल्याप्रकरणी महामंडळाच्या लेखाधिकाऱ्यावर सांगली शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामाच्या ठिकाणीच जबाबदार पदावर असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याने केलेल्या या विकृत प्रकारामुळे एसटी महामंडळाच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.