

Sugarcane fields
sakal
नवेखेड : जिल्ह्यात आडसाली, पूर्वहंगाम या दोन्ही हंगामांतील ऊस लागवड आटोपली आहे. सुरू हंगामातील ऊस लागवड शेतकरी करत आहे. सद्यःस्थितीत ८८ हजार २८२ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. यंदाच्या हंगामात अतिवृष्टीचा ऊस लागवडीस फटका बसला असल्याने पाच ते दहा टक्के क्षेत्र कमी होईल, असा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.