सांगलीच्या द्राक्ष पट्ट्याला पावसाने झोडपले

तासगाव, मिरज पूर्व, कवठेमहांकाळला फटका; रब्बी शेतकरी खुष
grapes farming
grapes farming sakal media

सांगली : श्रीलंका, तामिळनाडू किनाऱ्यालगतच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या जिल्ह्यांतही पावसाचा फटका बसतो आहे. तासगाव, मिरज पूर्व आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील द्राक्ष पट्ट्यातच आज पहाटे जोरदार पावसाने झोडपले. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी, सावळज, सावर्डे, डोंगरसोनी, मिरज तालुक्यातील एरंडोली, शिपूर परिसरात जोरदार पावसाने फुलोऱ्यातील द्राक्ष बागांना जोरदार फटका बसला. कवठेमहांकाळ घाटनांद्रे, नागज परिसरातही पाऊस झाला. नुकसानीचा नेमका अंदाज बांधणे तातडीने अशक्य आहे. द्राक्ष बागायतदारांसमोर एकामागून एक संकटांना सामोरे जावे लागत आहे. रब्बी हंगामातील पिकांना मात्र पाऊस उपयुक्त आहे.

grapes farming
"रोग आणि शत्रूंना कधीही कमी लेखू नये"

जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा घसरला असून थंडी कमी आणि उकाडा जाणवू लागला आहे. सांगली शहरात मंगळवारी रात्री पाऊस झाला. जिल्ह्यात बुधवारी पहाटे तीन ते चार दरम्यान जोरदार पाऊस झाला. आणखी चार दिवस जिल्ह्यात पावसाच्या अंदाजाने द्राक्ष उत्पादक शेतकरी उपाययोजना करण्यात मग्न आहेत. जिल्ह्यात द्राक्षाचे क्षेत्र १.२५ लाख एकर असून सध्या २५ ते ३० हजार एकर बागा फुलोऱ्यात आहेत.

मंगळवारपासून (ता. २) रविवारपर्यंत ( ता. ७) जिल्ह्यात हलक्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. पोंगा, फुलोऱ्यातील द्राक्षबागांना फटका बसणार आहे. पोंग्यात पाणी राहणार नाही आणि भविष्यात डाऊनीचा त्रास होणार नाही याची काळजी शेतकरी घेत आहेत. फुलोऱ्यातील बागांत गळ-कुज कमी होण्यासाठी हुकमी औषध नसली तरी त्यांची तीव्रता कमी करण्यासाठीची औषध फवारणी करण्यासाठी धावाधाव सुरु आहे. अन्य सर्व बागायतदार डाऊनीची दक्षता घेत आहेत.

grapes farming
"हीच योग्य वेळ! बड्या खेळाडूंना..."; कपिल देव यांचं मोठं विधान

उपाय...

पाऊस, धुके, दैवार बोध, पाणी नियोजन, डाउनी- करपा स्पोर्स, कॅल्शिअम, फॉस्फरस, बोरॉन कमतरता, द्राक्ष प्लॉट कॅनोपी गर्दी, अति पाणी देणे अश्या प्रकारची कारणे गळ कूज होत आहे. त्या रोखण्यासाठी या स्टेजला पाणी कमी करावे, शक्यतो पाणी पहाटे किंवा सकाळी पाणी द्यावे, जमीन वापसा कंडिशन वरती ठेवणे गरजेचे आहे. द्राक्ष प्लॉट कॅनोपी गर्दी करू नये. असेल तर ती लगेचच कमी करावी. शंभर टक्के फ्लॉवरिंग झाल्यावरतीच जी. ए. फवारणी करावी. गळ, कूज जास्त प्रमाणात होत असेल तर वरील फवारणी ईएसएस मशीनने घेणे योग्य ठरेल.

दिवस तापमान पाऊस अंदाज

( तापमान -अंश सेल्शियसमध्ये)

गुरुवार २२ ते २८ रात्री ९ वाजता

शुक्रवार २१ ते २६ हलका

शनिवारी २१ ते २६ रात्री ९ वाजता

रविवारी २१ ते २६ पहाटे १२ ते ३ पर्यंत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com