पळता भुई थोडी! झरेत दरोड्याचा प्रयत्न फसला, चोर पळाले पण दुचाकी सापडली

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 January 2021

 गेल्या काही दिवसापासून सांगली  जिल्ह्यातील 
झरे परिसरांमध्ये चोरट्यांनी  धुमाखुळ घातला आहे. अनेक गावांमध्ये तर गावकऱ्यांनी ग्रस्त  घातली तरीही चोरीच प्रमाण वाढतच आहे.  

झरे (सांगली) :  गेल्या काही दिवसापासून सांगली  जिल्ह्यातील 
झरे परिसरांमध्ये चोरट्यांनी  धुमाखुळ घातला आहे. अनेक गावांमध्ये तर गावकऱ्यांनी ग्रस्त  घातली तरीही चोरीच प्रमाण वाढतच आहे. मागील  चार दिवसांपूर्वीच दिवसाढवळ्या घर फोडून रोख रक्कम 3 लाखावर डल्ला मारला होता. भरदिवसा होणाऱ्या चोरीमुळे नागरिकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. 

आज अशीच एक घटना झरे ता.आटपाडी घडली आहे,येथील भिमराव गोरड यांचे बालाजी सराप दुकानाच्या मागील बाजूच्या दुकानात प्रवेश केला.  तिजोरी फोडत असताना आवाज झाल्याने गस्त घालणारे गुरखा तेथे आला . बॅटरीचा प्रकाश पाहून चोर दुकानातच लपले. त्यानंतर गुरखा थोड्यावेळाने पुन्हा  दुकानाकडे येऊन बॅटरी दाबली असता तिघेजण पळालेले दिसले.

हेही वाचा- विजय वडेट्टीवार यांच्या प्रातिनिधिक पुतळ्याचे कोल्हापुरात दहन

 बेंदवस्ती कडे चोरटे पळाले आणि मोहन पाटील यांच्या घराचे कुलूप तोडत असताना तेथील नागरिक जागे झाले. त्या नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग केला.परंतु दुचाकीवरून पळून जात असताना गाडी खड्डयात आदळली mh10 AE 1875 दुचाकी गाडी पडली. गाडी तेथेच सोडून चोरटे पळू लागले समोरून येणाऱ्या दुचाकीस्वार वर हल्ला केला परंतु  दुचाकीस्वराने  प्रतिकार करताच चोरांनी धूम ठोकली.

संपादन- अर्चना बनगे
.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sangli theft case marathi news crime news latest