
सांगली : जिल्ह्यातील नशाबाजाराची पाळेमुळे उखडून टाकण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी तातडीने पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक, अन्न औषध प्रशासनचे सहायक आयुक्त या पाच जणांचा ‘टास्क फोर्स’ नियुक्त केला आहे. दर सोमवारी या विषयाचा आढावा घेतला जाईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.