
सांगली : ‘‘अयोध्येतील श्री राम मंदिराच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त येथे १७ तारखेपासून श्रीराम कथा आणि नामसंकिर्तन सोहळा होणार आहे. प्रख्यात कथा प्रवक्ते समाधान शर्मा मराठीतून रामकथा सांगणार आहेत. येथील नेमिनाथनगर कल्पद्रूम क्रीडांगणावर त्यांची तयारी करण्यात आली आहे. राज्यभरातील हजारो रामभक्त या सोहळ्यात उपस्थित राहतील,’’ अशी माहिती संयोजन समितीचे कार्याध्यक्ष मनोहर सारडा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.