

Vishnudas Bhave: Pioneer of Marathi Theatre
Sakal
सांगली : मराठी रंगभूमीचे आद्यप्रवर्तक विष्णुदास भावे म्हणजे सांगलीचे भूषण. मराठी नाटकाचा उद्गाता म्हणून त्यांची ओळख रंगभूमीला ललामभूत ठरणारी. १८४३ साली त्यांनी लावलेला मराठी नाट्यप्रयोगाचा वेलू आज गगनावरी गेला आहे. सांगलीचे संस्थानिक चिंतामणराव पटवर्धन यांच्या सहकार्याने ‘सीता स्वयंवर आख्यान’ ही त्यांची पहिली कलाकृतीला मराठी नाटकाला जन्म देऊन गेली. त्यामुळे कर्मभूमी सांगली त्यांच्या कर्तृत्वाने नाट्यपंढरी झाली. त्यांच्या कळसुत्री बाहुल्यांचा खेळ त्याकाळी चांगलाच लोकप्रिय होता. त्यातील एक बाहुली आजही त्यांच्या कलेची साक्ष देत आहे. त्यांच्या नावाने असलेल्या नाट्यगृहात ती जतन करुन ठेवली आहे.