Sangli Election : युती तुटली तर युद्ध अटळ! सांगली प्रभाग ८ मध्ये सत्तासंघर्ष रंगणार
BJP–NCP Alliance Rift Raises : भाजप-राष्ट्रवादी युती फिस्कटल्याने प्रभाग ८ मध्ये बहुकोनी लढतीची शक्यता वाढली. विष्णू माने यांचा ‘सेफ गेम’ आणि मतविभाजन टाळण्याची रणनीती ठरणार निर्णायक, आरक्षण, इच्छुकांची गर्दी आणि आघाड्यांचे गणित यामुळे गुंतागुंतीची निवडणूक
सांगली : भाजप-राष्ट्रवादी युती फिस्कटण्याची चिन्हे दिसत असल्याने प्रभाग आठमधील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. तेथे हुकमी उमेदवार मानले जाणारे विष्णू माने अजितदादांच्या राष्ट्रवादीतून लढणार आहेत.