Chandrakant Patil
esakal
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील इशारा सभा ठरल्याप्रमाणे होईल, असे स्पष्ट केले.
भाजपच्या सभेत राष्ट्रवादी नेत्यांच्या क्लिप्स दाखवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
फडणवीसांबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने आले आहेत.
सांगली : इशारा सभेवर ठाम आहोत. ती ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी होईलच. त्या सभेत तुमच्या वाचाळवीर काय बोलले, त्याच्या क्लिप दाखवणार आहोत, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला येथे दिला.