ऑलिपिंकच्या संभाव्य खेळाडूमध्ये सांगलीचा वेटलिफ्टर संकेत सरगर

घनशाम नवाथे
Sunday, 9 August 2020

सांगली-  भारतीय खेल प्राधिकरण (साई) च्या मिशन ऑलिपिंक सेलने 12 खेळामधील 258 खेळाडूंची नावे टारगेट ऑलिपिंक पोडियम स्कीम (टॉप्स) डेव्हलपमेंट ग्रुपसाठी शॉर्टलिस्ट केली आहे. यामध्ये सांगलीचा आघाडीचा वेटलिफ्टर संकेत सरगर याचा समावेश आहे. या खेळाडूंकडे 2024 व 2028 चे ऑलिपिंकचे संभाव्य खेळाडू म्हणून पाहिले जाते. 

संकेत सरगर हा जिल्ह्यातील सध्याचा आघाडीचा वेटलिफ्टर म्हणून ओळखला जातो. वेटलिफ्टिंगमधील भीष्माचार्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवंगत नाना सिंहासने यांच्या दिग्विजय व्यायाम शाळेत तो सध्या सराव करतो. शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त मयुर सिंहासने यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा सराव सुरू आहे. संकेतने 2019- 20 मध्ये झालेल्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी वेटलिफ्टिंग स्पर्धा, खेलो इंडिया गेम्स, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स, वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदकांसह राष्ट्रीय उच्चांक नोंदवले आहेत. त्याच्या कामगिरीची दखल घेत "साई' च्या मिशन ऑलिपिंक सेलने त्याची देशभरातील 258 खेळाडूंमध्ये निवड केली आहे.

"टॉप्स' मध्ये निवड झालेल्या खेळाडूंना 2024 मध्ये पॅरिस येथे आणि 2028 मध्ये लॉस एंजल्स येथे होणाऱ्या ऑलिपिंक स्पर्धा तसेच कॉमनवेल्थ स्पर्धा व इतर आशियाई स्पर्धेसाठी तयार केले जाणार आहे. त्यासाठी खेल मंत्रालय मदत करणार आहे. 12 खेळातील 258 जणांची "टॉप्स' मध्ये निवड झाल्यानंतर त्यांना ऑलिपिंक्‍सचे संभाव्य खेळाडू म्हणून पाहिले जाईल असे केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी जाहीर केले आहे. संकेत सरगर याची "टॉप्स' मध्ये निवड झाल्यानंतर सर्वत्र अभिनंदन होत आहे. "टॉप्स' मध्ये निवड झाल्यानंतर त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli weightlifter Sanket Sargar is a potential Olympic player