
नवेखेड : सध्या जिल्ह्यात थंडीचा कडाका सुरू आहे. अशा स्थितीत शेतकऱ्याला रात्र-रात्रभर शेतात रब्बी पिकं जगवण्यासाठी ‘नाईट’ मारावी लागत आहे. महावितरण कंपनीकडून विजेचा लपंडाव सुरू असल्याने बळिराजा हताश आहे. या सरकारने रात्रीऐवजी दिवसा वीज देऊ, अशी घोषणा निवडणुकीआधी केली होती. त्याची अंमलबजावणी कधी होणार, असा सवाल शेतकरी करीत आहेत.