
Sangli Kupwad Crime : सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील प्रकाशनगर परिसरात कौटुंबिक वादातून पत्नीने झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. अनिल तानाजी लोखंडे (वय ५३, प्रकाशनगर, ६ वी गल्ली, कुपवाड) असे मृत पतीचे नाव आहे. दरम्यान, खूनप्रकरणी संशयित पत्नी राधिका अनिल लोखंडे (२७, कुपवाड) हिला कुपवाड पोलिसांनी अटक केली. वटपौर्णिमेच्या रात्री घडलेल्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. मुकेश मोहन लोखंडे (३५, साखर कारखाना, सांगली) यांनी कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.