Sangli Yerala River Drowning : येरळा नदीत ८ जण बुडाले, एका तरुणीचा मृत्यू; पोहण्याचा मोह ठरला जिवघेणा

Sangli drowning incident : सांगलीतील येरळा नदीत ८ जण बुडाल्याची धक्कादायक घटना. एका तरुणीचा मृत्यू झाला असून ७ जणांना वाचवण्यात यश आले. सविस्तर बातमी वाचा.
Sangli Yerala River Drowning news

Sangli Yerala River Drowning news

esakal

Updated on

Yerala river rescue operation details :भाळवणी (ता. खानापूर) येथे शिकलगार मळा परिसरातील येरळा नदीपात्रात पोहण्यास गेलेल्या फिरदोस जाकीर शिकलगार (वय २०, कोरेगाव, जि. सातारा) या तरुणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. याबाबत खासगी रुग्णालयामधील डॉ. राहुल वारे यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली. दरम्यान, या तरुणीबरोबर पोहण्यास गेलेल्या सात मुलांना वाचविण्यात त्यांच्या पालकांना व स्थानिक लोकांना यश आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com