सांगली : योग शिबिरात साधणार ‘एकात्म उपचार’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yoga

सांगली : योग शिबिरात साधणार ‘एकात्म उपचार’

सांगली : शारीरिक आणि मानसिक व्याधी निवारणात योग महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळेच गणेशनगरमधील रोटरीच्या हॉलमध्ये जागतिक योग दिनाचे औचित्य साधून १७ जूनपासून होणारे सात दिवसांचे योग शिबिर आरोग्यवर्धनात उपयुक्त ठरणार आहे. ‘सकाळ माध्यम समूह’, विश्‍व योग दर्शन केंद्र आणि रोटरी क्‍लब ऑफ सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित केला आहे. दररोज सकाळी साडेसहा ते आठ या वेळेत शिबिर होईल.

योग जीवनशैलीचा भाग बनावा, यासाठीच ‘सकाळ’ने गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, यंदा पाच दिवसांचे शिबिर घेण्याचा निर्णय घेतला आहे. योग विशारद बाळकृष्ण चिटणीस यांचे मार्गदर्शन आणि सल्ला लाभणार आहे. विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य व रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. भास्कर ताम्हणकर, सेक्रेटरी सलील लिमये यांचे शिबिरासाठी विशेष सहकार्य लाभले आहे.

योगविशारद बाळकृष्ण चिटणीस म्हणाले, ‘‘शारीरिक आणि मानसिक व्याधी निवारण्यासाठी एकात्म उपचार पद्धती गरजेची आहे. तीच या सात दिवसांच्या शिबिरात शिकवली जाणार आहे. यात आसने, प्राणायाम, सूर्यनमस्कार, शरीर शिथिल करणारे व्यायाम, मंत्रयोग, ध्यानयोग, योगनिद्रा शिकवली जाईल. सदृढ आरोग्यासाठी हा योगासने महत्त्वाची आहेत. हे शिबिर सर्वांसाठी मोफत असून, योगविशारदांकडून सल्ला व मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याचा सांगलीकरांनी लाभ घ्यावा.’’

फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढवणारे योग

‘‘निरोगी आणि सदृढ शरीरासाठी योगाभ्यास महत्त्वाचा असल्याचे हजारो वर्षांपासून सांगितले आहे. योगामुळे विविध आजारांवर मात करता येते. कोरोनात फुफ्फुसावर ताण पडत असल्याचे दिसून आले. यासाठी फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढवणारे योग शिबिरात शिकवले जाणार आहेत. तसेच मानसिक स्वास्थ्य टिकवणारे योगप्रकारही शिकवले जाणार आहेत,’’ असे बाळकृष्ण चिटणीस यांनी सांगितले.

Web Title: Sangli Yoga Camp Integrative Treatment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top