

Sangli Youth Dies During Police Recruitment
esakal
Maharashtra Police Recruitment News : छत्रपती संभाजीनगर येथे आज सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास पोलिस भरतीसाठी १ हजार ६०० मीटर धावण्याच्या चाचणीदरम्यान मोराळे (ता. पलूस) येथील तरुण संग्राम धोंडिराम शिंदे (वय २३) याचा चक्कर येऊन मृत्यू झाला. खाकी वर्दीचे स्वप्न उराशी बाळगून पोलिस भरतीसाठी गेलेल्या संग्राम शिंदे याचा धावताना मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. संग्राम याच्या दुर्दैवी मृत्यूने मोराळे व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.