Sangli ZP Mahayuti : 'झेडपी'त सव्वा वर्षांचे चार अध्यक्ष करू, चंद्रकांतदादांची भूमिका; शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला प्रस्ताव

Mahayuti Wins Majority in Sangli Zilla Parishad : सांगली जिल्हा परिषदेत महायुतीचे ३१ सदस्य विजयी झाले असून अध्यक्षपदावर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरू आहे.
Guardian Minister Chandrakant Patil

Guardian Minister Chandrakant Patil

esakal

Updated on: 

सांगली : केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीतील पक्षांची जिल्हा परिषदेवर सत्ता आली आहे. युतीतील पक्षांचे मिळून ३१ सदस्य विजयी झाले आहेत. आता युतीत पहिला अध्यक्ष कुणाचा करायचा, हा आमच्या चर्चेतील विषय आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष पहिल्यांदा संधी मागत आहेत. भाजपने त्यांना पाच वर्षांत चार अध्यक्ष करू (Sangli Zilla Parishad Election), भाजपचे सर्वाधिक १८ सदस्य असल्याने पहिल्यांदा आम्हाला संधी मिळावी, अशी भूमिका मांडली आहे. लवकर निर्णय होईल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

Vishal Patil and Samrat Mahadik Meeting
Satej Patil statement on Gokul election
Karmala ZP School
Vishal Patil Meets Devendra Fadnavis
Marathi News Esakal
www.esakal.com