सांगली : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत मविआ आणि भाजप दोघांनीही ताकद लावल्याने चुरस शिगेला पोहोचली आहे. संख्याबळ पाहता ‘मविआचं जमलंय, युतीचं अजून अडलंय’ अशी स्थिती आहे. .त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत सस्पेन्स वाढला आहे. दरम्यान, ‘मविआ’कडून अध्यक्षपदासाठी संगीता पाटील, तर उपाध्यक्ष पदासाठी ऋषिकेश लाड यांची नावे निश्चित झाल्याचे समजते..Sangli ZP: सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड १८ मार्चला; सत्ता स्थापनेचा पेच कायम : राजकीय हालचाली गतिमान .जिल्हा परिषदेच्या सभागृहात दुपारी दोन वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यासी अधिकारी म्हणून मिरजेचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे काम पाहणार आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल ९ फेब्रुवारी रोजी लागला. त्यानंतर जवळपास सव्वा महिन्यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडले जाणार आहेत. .जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पहिली अडीच वर्षे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. त्यासाठी जोरदार चुरस असून, मिनी मंत्रालयात कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे..निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाशी समझोता केल्याने त्यांच्याकडे ३६ सदस्यांसह बहुमत असल्याचा दावा करण्यात येत आहे. .Chandrakan Patil : भाजप 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत ; पालकमंत्री चंद्रकांत पाटील : प्रत्येक गटालाच अध्यक्षपद हवय.काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीचे सदस्य शनिवारीच अज्ञात स्थळी गेले आहेत. हे सदस्य उद्या निवडीवेळी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता स्थापनेची शक्यता बळावली आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर आघाडीचे उमेदवार विराजमान होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे..दुसरीकडे, महायुतीमधील घटक पक्ष एकमेकांविरोधात लढल्यामुळे ते स्वतंत्र आहेत. यातील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे सदस्य सोबत घेण्यात भाजपला यश आले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षही सोबत असल्याचा भाजप नेत्यांचा दावा आहे..दोन्ही पक्षांचे एकूण २५ सदस्य असून, सत्ता स्थापनेसाठी भाजप कोणती खेळी करणार, याची उत्सुकता वाढली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अध्यक्ष भाजपचाच होईल, असा दावा केला आहे. भाजप नेते महायुती म्हणून तीनही पक्ष मिळून सत्ता स्थापन करण्याबाबत आशावादी आहेत. त्यामुळे सत्ता स्थापनेची चुरस शिगेला पोहोचली आहे. .चौकटअजित पवार गटाच्या नाराजांवर भाजपचे लक्षमहाविकास आघाडीकडून अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी उमेदवार निश्चित झाले आहेत. मात्र, सभापतिपदावरून राष्ट्रवादी अजित पवार गटात अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या नाराजांवर भाजपचे लक्ष आहे. हे नाराज गळाला लावल्यास भाजपचे संख्याबळाचे गणित जमू शकते..चौकटअध्यक्षपदाच्या दावेदार अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. या पदासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून संध्या पाटील (वाटेगाव गट), संगीता पाटील (कासेगाव), भाजपकडून स्वप्नाली मासाळ (डफळापूर गट), माधवी पडळकर (निंबवडे) यांची नावे चर्चेत आहेत..‘मविआ’कडून संगीता पाटील, ऋषिकेश लाडमविआ नेत्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्षपदासाठी संगीता पाटील, तर उपाध्यक्षपदासाठी ऋषिकेश लाड यांची नावे निश्चित झाल्याचे समजते. मविआ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा समझोता झाला असून, पहिली सव्वा वर्ष शरद पवार गटाला अध्यक्षपद मिळणार आहे. पुढची सव्वा वर्षे अजित पवार गटाला संधी मिळणार आहे. पहिल्या टर्ममध्ये अजित पवार गटाला दोन सभापतिपदे मिळणार आहेत. .निवडीचा कार्यक्रमसकाळी ११ ते १२- अर्ज दाखल करणेदुपारी १२.३० पर्यंत - अर्जांची छाननीदुपारी १ पर्यंत- अर्ज मागे घेण्याची मुदतदुपारी २ वाजता- अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी सभा.पक्षीय बलाबलराष्ट्रवादी (शरद पवार) = १८भारतीय जनता पार्टी = १६राष्ट्रीय काँग्रेस = ११शिवसेना (शिंदे) = ७राष्ट्रवादी (अजित पवार) = ६जनसुराज्य = १शिवसेना (उबाठा) = १रयत क्रांती = १.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.