
सांगली : ‘आमचा उदरनिर्वाह पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. शेतकरी अल्पभूधारक असून ते भूमिहीन होत आहेत. त्यामुळे ‘शक्तिपीठ’ रस्त्यास आमचा पूर्णपणे विरोध आहे. तेव्हा, रेखांकनाला येऊ नये; अन्यथा प्रतिकार करण्यात येईल,’ असा पवित्रा आज सांगलीवाडीतील शेतकऱ्यांनी घेतला.