Sangola News : सांगोल्याच्या हक्काचे पाणी अकलूजकरांसह बारामतीकरांनी पळवले; आमदार शहाजीबापू पाटील

अकलूजकरांसह बारामतीकरांनी सांगोला तालुक्याच्या हक्काचे पाणी पळवून तालुका दुष्काळाच्या खाईत लोटला.
sangola water to akluj baramati mla shahaji bapu patil agriculture
sangola water to akluj baramati mla shahaji bapu patil agricultureSakal

सांगोला : अकलूजकरांसह बारामतीकरांनी सांगोला तालुक्याच्या हक्काचे पाणी पळवून तालुका दुष्काळाच्या खाईत लोटला. शेतीच्या पाण्याच्या बाबतीत शरद पवारांसह मोहिते पाटील यांनी कायमच सांगोला तालुक्यावर अन्याय केला आहे.

मात्र, विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बारामतीकरांशी दोन हात करून सांगोला तालुक्याला हक्काचे पाणी मिळवून दिले. सांगोला तालुक्यात हरितक्रांती होण्यासाठी दुष्काळी भागाला पाणी वळवणारा खासदार म्हणून रणजितसिंह निंबाळकर यांना प्रंचड मतांनी विजयी करावे, असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले.

माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आमदार. शहाजीबापू पाटील व माजी आमदार दीपकआबा साळुंखे- पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगोला तालुक्यात गावभेट दौरा संपन्न झाला.

कमलापूर, अनकढाळ, राजुरी, उदन वाडी, पाचेगाव, ह.मंगेवाडी, जुजारपूर, हातीद, सोमेवाडी, बुद्धेहाळ, गौडवाडी या गावात गावभेट दौरा करून मतदारांशी संवाद साधला. त्यानंतर जुनो नी येथे जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, अकलूजकरांसह बारामतीकरांनी शेतीच्या पाण्याबाबत सांगोला तालुक्यावर अन्याय केल्याची भावना शेतकऱ्यांच्या मनात आजही आहे. त्यामुळे सांगोल्याचं पाणी पळवणाऱ्या पवारांसह मोहिते पाटलांनी जनतेची दिशाभूल करू नये.

गेल्या पाच वर्षांत शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचे आवर्तन चांगल्या प्रकारे मिळाल्याने लोकसभा निवडणुकीत पाणीप्रश्न टर्निंग पॉईट ठरला आहे. सांगोल्याच्या हक्काचे बारामतीकरांनी पळवून नेलेले पाणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुन्हा हे पाणी दुष्काळी भागाला वळवले आहे.

तालुक्यासाठी वरदायिनी ठरलेल्या टेंभू योजनेचा विस्तार करून अधिकचे दोन टीएमसी पाणी तालुक्याला मिळाले आहे. ऐन उन्हाळ्यात शेतीचा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी टेंभू योजनेतून माण नदीत पाणी सोडले आहे.

शरद पवारांनी सांगोला तालुक्याचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी मिटवू अशी मावळत्या सूर्याला साक्ष मानून शपथ घेतली होती. मात्र, शरद पवार आणि मोहिते पाटील यांना पाणीप्रश्न सोडविण्यात सपशेल अपयश आले. विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आणल्याने त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com