'पक्षाचा उमेदवार असतानाही अपक्षाला पाठिंबा देणे हे अजित पवारांचे दुर्दैव!'

भारत नागणे
Tuesday, 8 October 2019

अजित पवार यांनी वेळापूर येथे करमाळयात अपक्ष उमेदवार संजय शिंदे आणि सांगोल्यात शेकापचे उमेदवार डाॅ. अनिकेत देशमुख यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार संजय पाटील आणि दीपक साळुंखे यांची मोठी गोची झाली आहे.

पंढरपूर : करमाळा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीने अधिकृत उमेदवारी दिलेली असतानाही काल अचानक अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर करणे हे अजित पवारांचे दुर्दैव असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे उमेदवार संजय पाटील यांनी दिली आहे.

पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर मी दोन वेळा मतदार संघाचा दौरा पूर्ण केला आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रेम शरद पवारांवर आहे. त्यामुळे या निवडणूकीत राष्ट्रवादीला यश मिळणार असताना ही अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या उमेदाराचा प्रचार न करता अपक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. असे असले तरी मी पूर्ण ताकदीनिशी शरद पवारांच्या विचारा नुसार निवडणूक लढवणार असल्याचे ही संजय पाटील यानी सांगितले.

अजित पवार यांनी वेळापूर येथे करमाळयात अपक्ष उमेदवार संजय शिंदे आणि सांगोल्यात शेकापचे उमेदवार डाॅ. अनिकेत देशमुख यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार संजय पाटील आणि दीपक साळुंखे यांची मोठी गोची झाली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Patil attacks NCP leader Ajit Pawar on ticket distribution