Former MP Sanjay Patil
esakal
माजी खासदार संजय पाटील यांनी विकास आघाडीच्या नावाने राजकारणात नवा अध्याय सुरू केला.
वर्षभर शांत राहिल्यानंतर त्यांनी राजकीय हालचालींना वेग दिला.
अजित पवार गटातील भूमिका अनिश्चित असताना त्यांनी स्वतंत्र आघाडीची घोषणा केली.
तासगाव : माजी खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांनी पुन्हा एकदा राजकारणात विकास आघाडीचा नवा डाव टाकला आहे. तालुक्याच्या राजकारणाने पुन्हा एक वळण घेतले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था विकास आघाडीच्या नावाखाली लढवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. संजय पाटील यांच्या मनात आहे तरी काय? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.