
सांगली : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून विधानसभा निवडणूक लढलेले माजी खासदार संजय पाटील यांची भाजपमध्ये घरवापसी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांनी आज कोल्हापुरात झालेल्या भाजप संघटन पर्व कार्यशाळेला हजेरी लावली. पहिल्या रांगेत त्यांना स्थान होते. गळ्यात भाजपचा गमचा नव्हता, अन्यथा त्यांचा वापर पूर्वीसारखा भाजपमय असल्याचे दिसत होते. आता प्रवेशाला मुहूर्त कधीचा, याबाबत चर्चा रंगल्या आहेत.