
सांगली: ‘‘खासदार संजय राऊत यांनी सिंदूर रक्तदान यात्रेवर नाहक टीका करण्याची गरज नव्हती. कुणाच्याही रक्ताची निंदा करणे, वाईटच. किमान सैन्याप्रती आम्ही दाखवलेल्या प्रेमाचा सन्मान ठेवता येत नसला तरी अपमान करू नका,’’ अशी प्रतिक्रिया डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दिली.