संकेत सरगर आज ‘राष्ट्रकुल’मध्ये खेळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanket Sargar will play in Commonwealth game today

संकेत सरगर आज ‘राष्ट्रकुल’मध्ये खेळणार

इस्लामपूर - येथील कासेगाव शिक्षण संस्थेच्या आष्टा येथील आर्टस् अॅण्ड कॉमर्स कॉलेजचा विद्यार्थी संकेत सरगर याची बर्मिंगहॅम (इंग्लड) येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय वेटलिफ्टिंग संघामध्ये निवड झाली आहे. संकेत ५५ किलो वजनी गटामध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. शनिवारी (ता. ३०) दुपारी दीड वाजता खेळणार आहे. ही माहिती प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर यांनी दिली. वेटलिफ्टिंगमध्ये अशी निवड होणारा संकेत राज्यातील पहिला खेळाडू आहे. त्याच्याकडून पदकाची अपेक्षा आहे.

ते म्हणाले, ‘‘संकेतची राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवड ही बाब सांगली जिल्हा, वाळवा तालुक्यासाठी व कासेगाव शिक्षण संस्था व राज्यासाठी अभिमानाची आहे. वेटलिफ्टिंगमध्ये अशी निवड होणारा संकेत हा राज्यातील पहिला खेळाडू आहे. त्याच्याकडून पदकाची अपेक्षा आहे. त्याने तीन वेळा नॅशनल चॅम्पियनशिप जिंकली आहे व विक्रमही केला आहे.

तसेच ‘खेलो इंडिया’- इंटर युनिव्हर्सिटी व ‘खेलो इंडिया’- यूथ गेम्समध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.’’ माजी मंत्री, आमदार जयंत पाटील, अध्यक्ष शामराव पाटील, सचिव प्राचार्य आर. डी. सावंत, प्रतीक पाटील, सहसचिव व प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर, शिक्षण संचालक प्रा. आक्रम मुजावर यांनी शुभेच्छा दिल्या.

Web Title: Sanket Sargar Will Play In Commonwealth Game Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top