Accident News : संख-पंढरपूर मार्गावर उमदीजवळ भीषण अपघात; १ चा मृत्यू, ६ महिला जखमी

road safety issue : उमदीजवळ झालेल्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला असून सहा महिला जखमी झाल्या आहेत. जखमींवर उपचार सुरू असून पोलिस तपास करत आहेत.
tragic road accident

tragic road accident

sakal

Updated on

संख : संखहून पंढरपूरकडे चैत्र एकादशीनिमित्त देवदर्शनासाठी निघालेल्या चारचाकीचा उमदीजवळ अपघात झाला. चालकाचा मृत्यू झाला, तर सहा महिला जखमी झाल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे चैत्र एकादशीनिमित्त संख येथून पंढरपूरकडे लोक देवदर्शनासाठी निघाले होते. उमदीजवळ असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळी मिळाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com