संस्कारभारती ऑनलाईन कार्यशाळेत 80 जणांनी साकारला मातीचा गणपती 

घनश्‍याम नवाथे
Sunday, 23 August 2020

सांगली-  कोरोनाचे सावट असताना दुसरीकडे विघ्नहर्त्या श्री गणेशाच्या मुर्ती तयार करण्याची अनोखी ऑनलाईन प्रशिक्षण शाळा कला ,संस्कृती जपणाऱ्या संस्कारभारती सांगली समितीच्यावतीने उत्साहात झाली. कार्यशाळेत 80 जणांनी सहभाग घेऊन गणरायाच्या सुबक मुर्त्या तयार करण्याचा आनंद घेतला. सुंदर भावविश्‍व दर्शवणाऱ्या मुर्त्या निर्मितीचा आनंद फारच मोठा होता. 

समितीच्या सचिव कविता कुलकर्णी म्हणाल्या, ""संस्कार भारती सांगली समितीतर्फे दरवर्षी पर्यावरण पूर्वक गणपती बनवण्याची कार्यशाळा गेली काही वर्षे घेतली जात आहे. यंदा कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर ही कार्यशाळा प्रत्यक्ष स्वरूपात होणे शक्‍य नसल्याने ऑनलाईन घेतली. नाव नोंदणी केलेल्या प्रत्येकासाठी गणपती बनवण्याचे व रंगवण्याचे साहित्य असलेले एक किट करण्यात आले होते. या किटमध्ये दोन किलो शाडू माती, एक कलर पॅलेट (नॅचरल रंगांचे), एक प्रायमरची डबी, एक स्किन कलरची डबी, सोनेरी रंग डोळे काढण्यासाठी एक काळे स्केच पेन वगैरे साहित्य समाविष्ट होते. 

पर्यावरण पूर्वक बाप्पा बनवण्यासाठी ऑनलाइन व्हिडिओ दोन भागात विभागला होता. यामध्ये गणपती बनवण्याची प्रक्रिया, माती मळणे ते उंदीर तयार करणे अशा तेरा भागात विभागली होती. दुसरा व्हिडीओ जो गणपती रंगवण्याचा होता. हा व्हिडीओ मूर्तीची सफाई ते मूर्तीला गंध काढणे अशा 9 भागात विभागलेला होता.'' 
गणपती तयार करणे व रंगवणे याचे मार्गदर्शन संस्कार भारती सांगली समितीचे कार्यकर्ते अरुण परचुरे व तुषार पतंगे, सुमेध जोशी यांनी केले. गणपती तयार केल्यावर काहीजणांनी उरलेल्या मातीतून शाडूच्या हरतालिका सुद्धा साकारल्या. या सर्व प्रक्रियेमध्ये प्रशिक्षक अरुण परचुरे, तुषार पतंगे तसेच प्रसाद करगणी, सागर सगरे, माधव वैशंपायन यांनी मार्गदर्शन केले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanskarbharati Online Workshop 80 people making Ganpati