
सातारा : सातारा जिल्ह्यात साेमवारी 40 रुग्ण उपचार घेऊन घरी परतले ताेच मंगळवारी सकाळी पर्यंत 40 काेराेना बाधितांची वाढ झाल्याने सातारा जिल्ह्याला मिळालेला दिलासा हा आैट घटकेचा ठरला आहे. सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, सातारा, जावळी, खंडाळा, माण आदी तालुक्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ हाेऊ लागली आहे.
दरम्यान साेमवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानूसार 18 बाधित तालुकानिहाय रुग्णांमध्ये कराड वानरवाडी 4, पाटण जांभेकरवाडी 1, वाई - दह्याट 1, महाबळेश्वर - हरचंदी 1, कासवंड - 3, सातारा - कुस ( बु.) 2, जावळी रांजणी 1, आंबेघर 1, खंडाळा - शिरवळ - 1, माण - पिंपरी - 3 याचा समावेश आहे. या बराेबरच सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 17 जणांचे देखील रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. तसेच मुंबईवरुन आलेल्या व घरीच क्वॉरंटाईन असेलल्या भोगाव (ता. वाई) येथील रक्त दाबाचा त्रास असलेल्या 85 वर्षीय महिला. सारीचा आजार असलेली गिरवी (ता. फलटण) येथील 65 वर्षीय महिला तर 15 वर्षापूर्वी कॅन्सरने आजारी असलेला 29 मे रोजी मुंबई येथून आलेला 52 वर्षीय पुरुष अशा तीन जणांचा मृत्यू झाला. मृत्यू पश्चात त्यांच्या घाशातील स्त्रावाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.
बाधित रुग्णांमध्ये फलटण तालुक्यातील बरड येथील 55 वर्षीय महिला, वडाळे येथील 35 वर्षीय पुरुष. जावळी तालुकयातील कावडी येथील 52 वर्षीय महिला, कळकोशी येथील 41 वर्षीय पुरुष, केळघर (सोळशी) येथील 39 वर्षीय महिला.कराड तालुक्यातील विंग येथील 43 वर्षीय महिला, 19 वर्षीय तरुण. पाटण तालुक्यातील काळेवाडी येथील 21 वर्षीय महिला, नवसरेवाडी येथील 25 व 22 वर्षीय पुरुष. खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 72 वर्षीय महिला. खटाव तालुक्यातील अंभेरी येथील तीन व सहा वर्षीय बालीका, 29 वर्षीय पुरुष. महाबळेश्वर तालुक्यातील हरचंदी येथील 53 वर्षीय महिला, गोरोशी येथील 72 वर्षीय महिला. वाई ग्रामीण रुग्णालयातील 24 वर्षीय महिला आरोग्य सेवकांचा समावेश आहे.
पाटण तालुक्यातील नवसरवाडी येथील 1 (60 वर्षीय पुरुष), वाई तालुक्यातील वोव्हाळी येथील 1 (42 वर्षीय पुरुष) व जांभळी येथील 1 (11 वर्षीय मुलगी), महाबळेश्वर तालुक्यातील कोट्रोशी येथील 1 (10 वर्षीय मुलगी) व हरचंदी येथील 1 (63 वर्षीय पुरुष) असे एकूण पाच रुग्णांचा रिपोर्ट कोविड बाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
डॉन म्हणून आला अन् चोप खाऊन गजाआड झाला
सरकारचा निर्णय आगतिकतेने नव्हे : बंडातात्या कऱ्हाडकर
रेशनिंग दुकानदारांचा ठाकरे सरकारला दणका; धान्य वाटप बेमुदत बंद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.