साताऱ्यात दोन्ही राजेंसह 75 जणांवर गुन्हे दाखल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

सातारा - दारूचे दुकान काढण्यावरून काल साताऱ्यात झालेल्या तणावाप्रकरणी दोन गुन्हे शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या 70 ते 75 समर्थकांवर गुन्हा दाखल झाला आहे, तर दारू दुकानाचे मालक रवींद्र ढोणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उदयनराजेंसह त्यांच्या सहा समर्थकांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

येथील जुन्या भाजी मंडईसमोरील नगरसेवक रवींद्र ढोणे यांचे देशी दारूचे दुकान काढण्यावरून उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे समोरासमोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी हवालदार धनंजय कुंभार यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे व दोघांच्या सुमारे 70 ते 75 कार्यकर्त्यांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

दरम्यान, नगरसेवक ढोणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उदयनराजे, सत्यजित खुटाळे, केदार राजेशिर्के, महेश शिंदे, मयूर चिकणे, पद्माकर खुटाळे यांच्यावर गर्दी-मारामारीचा गुन्हा दाखल झाला आहे. काल उदयनराजे व वरील संशयित दुकानात आले. मला बाहेर बोलावून घेतले. त्यानंतर "दुकान बंद कर नाहीतर दुकान फोडीन, मी दुकान फोडायला आलोय, तू गाडीत बसून निघून जा. नाहीतर तुझी गाडी फोडीन, तुझ्या शिवेंद्रला बोलव कोणीबी येऊ दे. तुझे दुकान पडणारच. बंद नाही केले तर मारून टाकीन,' अशी धमकी त्यांनी दिल्याचे ढोणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: In Satara 75 accused including both the raje Filing of complaints