जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणतात थाेडा रुकाे ताे सही

जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणतात थाेडा रुकाे ताे सही

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 80 इतकी झालेली आहे. आत्तापर्यंत दाेघांचा मृत्यू झाला असून अकरा बाधित काेराेनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील सातारा शहर आणि परिसर तसेच कराड येथे कटेंन्मेट झाेन लागू केले आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या नव्या निर्देशानूसार त्याची क्षेत्र मर्यादा कमी केली जाईल. दरम्यान या दाेन्ही ठिकाणी घरपाेच दूध, किराणा आणि आैषधांचा पूरवठा केला जाईल. दरम्यान जिल्ह्यामध्ये दुकाने टप्प्या टप्प्याने उघडण्याचे आदेश केले जाणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी पाेलिस अधीकक्षक तेजस्वी सातपुते उपस्थित हाेत्या. 

जिल्हाधिकारी सिंह म्हणाले  पाटण तालुक्यातील ढेबेवाडी, तळमावले, मल्हार पेठ, नाडे (नवा रस्ता), तारळे इत्यादी ग्रामपंचायतींना व नगर पंचायत पाटण या परिसराच्या नजीक असलेल्या कराड परिसरातील अत्यावश्यक सेवेतील किराणा माल, औषधांची दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत चालू ठेवण्यासाठी सुट देण्यात आली आहे. तसेच या क्षेत्रांमध्ये भाजीपाला घरपोच पुरविण्याबाबत उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सिडंट कमांडर, पाटण ज्या प्रमाणे यंत्रणा उभारतील त्याप्रमाणे भाजीपाला घरपोच पुरविण्यात येईल. सातारा आणि कराड या कंटेनमेंट झोनमध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी दूध, किराणा माल आणि आैषध  केवळ घरपाेच दिल्या जातील. कंटेनमेंट झाेनच्या क्षेत्राच्या मर्यादा कमी केली जाईल. 

सातारा जिल्हा हा रेड झाेनमध्ये असल्याने पुणे आणि मुंबईहुन येणाऱ्या कोणालाही जिल्ह्यात परवानगी देण्यात आलेली नाही. जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी नऊ 9 रस्ते आहेत. जिल्हयात येण्यासाठी सर्व मार्ग, रस्ते बंद केले आहेत. प्रमुख नऊ स्त्यांवर बंदोबस्त कडक केला आहे. याबराेबरच कन्टेन्टमेंट झोनमधून नॉन काँटेन्मेंट झोनमध्ये प्रवास करता येणार नाही. नॉन काँटेन्मेंट झोनमधून कन्टेन्टमेंट झोनमधून प्रवास करता येणार नाही. जिल्ह्यात शिवभोजन, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून एकही नागरिक उपाशी राहू नये याची काळजी घेत आहोत.

सातारा आणि कराड येथे लोक अनावश्यक घरा बाहेर येऊ नयेत याची खबरदारी घेणार आहोत. अनावश्यक वाहतूक बंदच राहील. घरपोच सुविधा मिळत नाहीत अशा अडचणी आहेत त्या दूर करू. सद्यस्थितीत सातारा जिल्ह्यात मद्य विक्री सुरु करण्याचा काेणत्याही विचार नाही. त्याबाबत याेग्य त्यावेळी निर्णय घेतला जाईल. याव्यतरिक्त जिल्ह्यातील ग्रामीण भागात टप्प्या टप्याने दुकान उघडण्यास परवानगी दिली जाईल. 

सातारा आणि कराड या दाेन्ही शहरात काेणत्याही वैद्यकीय अधिकारी यांन खासगी दवाखाना बंद ठेवा असे सांगितलेले अथवा आदेश नाहीत. मला खात्री आहे डाॅक्टर त्यांची सेवा बजावत आहेत. ज्या ठिकाणहून तक्रारी असतील तेथे कारवाई केली जाईल. नागरीकांनी 1077 या हेल्पलाईनवर तक्रारी नाेंदवाव्यात. विषाणू थोपविण्यासाठी आपण हे सर्व करीत आहोत.नागरिकांनी सहकार्य करावे. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित लढले पाहिजे असे आवाहनही जिल्हाधिकारी सिंह यांनी केले. 

थांबा! व्हॉट्‌सऍपवर पाेस्ट करण्यापुर्वी हे वाचा

चिंताजनक ! कोरोनानंतर आता सारीने दाेघांचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com