चिंताजनक ! कोरोनानंतर आता सारीने दाेघांचा मृत्यू

चिंताजनक ! कोरोनानंतर आता सारीने दाेघांचा मृत्यू
Updated on

सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे साेमवारी (ता. चार मे) रात्री उशिरा आठ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. यापैकी दाेन जणांचा श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे (सारी) मृत्यु झाला आहे. संशयित म्हणून त्यांचे घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अऩ्य सहा 6 जणांच्या घशातील नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
 

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 27, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील  2, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 32 असे एकूण 61 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी सांगितले.

ताप, खोकला आणि दम लागणे ही लक्षणे सारीच्या आजाराची आहेत. ही तीव्र लक्षणे कोरोनाच्या रुग्णामध्ये जाणवतात. सारी, स्वाइन फ्लू आणि कोरोना यांची लक्षणे मिळतीजुळती असल्याने आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार या साऱ्यांची कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक केली आहे. 

इतके बळी घेणारा हा सारी आजार आहे तरी काय...

कऱ्हाड : एका क्लिकवर मिळवा किराणा माल घरपाेच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

how heirs apply for PM Kisan after death
Why are Sangli gram panchayat funds stalled?
Chandoli Sanctuary wildlife attack protest
Ramdas Athawale receives highway protest memorandum
Marathi News Esakal
www.esakal.com