साहित्य क्षेत्रालाही कोरोनाचा डंक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

कोरोनामध्ये केलेल्या लॉकडाउनमुळे सर्वच क्षेत्रात मोठा आर्थिक तोटा झाला आहे. महसूल घटल्याने राज्य सरकारही अडचणीत आहे. त्यामुळे आर्थिक बचतीचे विविध उपाय योजले जात आहेत. त्यातूनच सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानातही कपात करण्यात आली आहे. त्यामुळे प्रकाशन संस्थाही अडचणीत सापडल्या आहेत. 

गोडोली (जि. सातारा) ः दर वर्षी दोन टप्प्यांत 100 टक्के अनुदान दिले जात असल्याने सार्वजनिक वाचनालयाचा आर्थिक गाडा कसा बसा रेटला जातो; पण या वर्षी कोरोनामुळे दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाला 40 ते 50 टक्‍क्‍यांपर्यंत कात्री लागली. "ड' वर्गातील ग्रंथालयाची अनुदानाची रक्कम कमी असल्याने ती देण्यात आली; पण इतरांची कपात करूनच रक्कम खात्यावर जमा झाली. या सगळ्या व्यवहारात प्रकाशन संस्थांचे शंभर 100 कोटींचे नुकसान झाले आहे. 

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयासाठी सहायक अनुदानासाठी 125 कोटी रुपयांची तरतूद आली. मात्र, 60 टक्के रक्कमच वितरित करून खर्च करण्यास मान्यता दिली आहे. सहायक अनुदानासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीमधून संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांना सार्वजनिक ग्रंथालयांच्या परीक्षण अनुदानाच्या पहिल्या हप्त्यातील निधी वितरित करण्यात आला आहे. निधीमध्ये कपात करण्यात आल्याने नवीन पुस्तक खरेदी व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी ग्रंथालयाकडे निधी शिल्लक नसल्याने त्यावर मर्यादा आल्या आहेत. पर्यायाने प्रकाशन संस्थाही अडचणीत आल्या आहेत. या संदर्भाने संस्कृती प्रकाशनच्या सुनीताराजे पवार म्हणाल्या, ""जवळजवळ 100 कोटींपर्यंतचे नुकसान प्रकाशन संस्थांचे झाले आहे. यंदा कोरोनाचा उद्रेक झाल्याने कोणत्याच पुस्तकांची खरेदी करता आली नाही.'' 

राज्यात "अ', "ब', "क', "ड' या श्रेणीतील 12,873 ग्रंथालये आहेत. प्रकाशकांचा आर्थिक व्यवहार सार्वजनिक ग्रंथालयावरच अधिक अवलंबून आहे. कर्मचाऱ्यांचा पगार, भाडे व इतर खर्च अनुदानावरच अवलंबून असल्याने सध्या सगळेच व्यवहार अडचणीचे झाले आहेत. कोरोनाच्या संकटातून उभारी घेण्यास किती महिने जातील हे सांगता येत नसल्याने कर्मचारी व संचालक धास्तावले आहेत. सध्या ग्रंतालये बंद असल्याने वाचकांना पुस्तके घरपोच देणेही अडचणीचे झाले आहे. 

जवळजवळ 100 कोटीपर्यंतचे नुकसान प्रकाशन संस्थांचे झाले आहे. यंदा कोरोनाचा उद्रेक झाल्याने कोणत्याच पुस्तकांची खरेदी करता आली नाही. 

- सुनीताराजे पवार, संस्कृती प्रकाशन 

 

श्वास घेताे न घेताे ताेच तिसरा मृत्यू झाल्याचा अहवाल आला

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Corona blow to the literary field