श्वास घेताे न घेताे ताेच तिसरा मृत्यू झाल्याचा अहवाल आला

श्वास घेताे न घेताे ताेच तिसरा मृत्यू झाल्याचा अहवाल आला
Updated on

सातारा : सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 52 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले  आहेत. तसेच वाई तालुक्यातील असले येथील मुंबई वरून आलेला मधुमेह असलेला 67 वर्षीय कोविड बाधित रुग्णाचे निधन झाले आहे. तसेच जांभेकरवाडी ता. पाटण येथील 70 वर्षीय महिला व मुंबई येथून प्रवास करुन आलेला माण तालुक्यातील भालवडी येथील 62 वर्षीय पुरुष या दोघांचे मृत्यू पश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.

या बाधित रुग्णांमध्ये माण तालुक्यातील म्हसवड येथील 48 वर्षीय पुरुष, तोंडले येथील 58 वर्षीय पुरुष, भालवडी 62 वर्षीय पुरुष (मृत्यु), लोधवडे येथील 34 वर्षीय व 28 वर्षीय महिला. खटाव तालुक्यातील वांझोली येथील 52 वर्षीय पुरुष व अंभेरी येथील 14 वर्षीय युवक. सातारा तालुक्यातील खडगाव येथील 48 वर्षीय पुरुष, जिमनवाडी येथील 21 वर्षी युवक, कुस बुद्रुक 45 वर्षीय महिला. वाई तालुक्यातील आकोशी येथील 58 वर्षीय पुरुष,  आसले येथील 40 वर्षीय पुरुष, मालदपूर येथील 24 वर्षीय पुरुष, देगाव येथील 55 वर्षीय महिला,  सिद्धनाथवाडी येथील 25 वर्षीय पुरुष, धयाट येथील 52 वर्षीय पुरुष. पाटण तालुक्यातील धामणी येथील 35 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय पुरुष  जांभेकरवाडी 70 वर्षीय महिला, गमलेवाडी येथील 31 वर्षीय पुरुष,  मन्याचीवाडी येथील 20 वर्षीय युवक, मोरगिरी येथील 58 वर्षीय पुरुष व 72 वर्षीय महिला, आडदेव येथील 35 वर्षीय पुरुष. खंडाळा तालुक्यातील अंधोरी येथील 72 वर्षीय पुरुष व 8 वर्षीय मुलगा, घाटदरे येथील 47 वर्षीय महिला, पारगाव येथील 27 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला, 50 वर्षीय दोन पुरुष, 25 वर्षीय पुरुष, 78 वर्षीय पुरुष. जावली तालुक्यातील सावरी येथील 39 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला व 7 वर्षांची मुलगी, केळघर येथील 16 वर्षीय युवक 44 वर्षीय पुरुष. महाबळेश्वर तालुक्यातील कासरुड येथील 26 वर्षीय पुरुष  व 18 वर्षी युवक, देवळी येथील 9 वर्षाचा मुलगा, 42 वर्षीय पुरुष व एक महिला, गोळेवाडी येथील 42 वर्षीय महिला. कराड तालुक्यातील खराडे येथील 45 वर्षीय महिला व 55 वर्षीय पुरुष, म्हासोली येथील 20 वर्षीय युवती. फलटण तालुक्यातील सस्तेवाडी येथील 21 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

दरम्यान एन.सी.सी.एस. पुणे यांनी 97 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे कळविले आहे. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 59 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे यांच्याकडे तपासणीठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. गडीकर यांनी दिली आहे. दरम्यान आत्तापर्यंत जिल्ह्यात 394 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 126 रुग्ण बरे झाले आहेत.  तर 256 रुग्णांवर उपचार सुरु असून 12 जणांचा मृत्यु झालेला आहे.

ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा 

कन्या शाळेतील चिमुकलीने पॉकेटमनीतून भागवली गरजूंची भूक

नऊ वर्षांच्या मुलीसह चौघे कोरोनामुक्‍त

साखर झोपेतच सातारा जिल्ह्याला धक्का

रेशनिंग दुकानदारांचा सरकारला इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kelghar Ghat Landslide
India sugar price hike due to production decline
BSNL network problem in Sangli villages
Solapur crime
Marathi News Esakal
www.esakal.com