म्हणून : दुपारी तीनला पश्चिम महाराष्ट्र हादरला

Karad Became HOTSPOT
Karad Became HOTSPOT

कऱ्हाड :  कऱ्हाड तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी १३ रूग्णांची भर पडल्याचे आज दुपारी आरोग्य विभागाच्या अहवालातुन स्पष्ट झाले आहे. यामध्ये कऱ्हाड शहरातील मंगळवार पेठेसह आगाशीवनगर, तांबवे, गमेवाडी, गोटे, उंब्रज वनवासमाची येथील रुग्णांची समावेश आहे. त्यामुळे कऱ्हाड तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 86 वर गेल्याने कऱ्हाडकर चांगलेच धास्तावले आहेत. तसेच क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रूग्णालयात आणखी पाच कोरोनाबाधित सापडल्याने जिल्ह्याची संख्या ११३ वर गेली आहे.
 
आजच सकाळी मलकापुर-आगाशिवनगर येथील दोन बाधित रुग्ण सापडले होते. एकाच दिवशी दुपारपर्यंतच बाधितांची संख्या १५ ने वाढल्याने आबालवृध्दांसह प्रशासनही गडबडून गेले आहे. कऱ्हाड तालुक्यातील बाधितांची संख्या वाढुन ती 86 कडे गेल्याने कऱ्हाडकरही चांगलेच धास्तावले आहेत.

 सातारा, सांगली व कोल्हापुर जिल्ह्यात कऱ्हाडलाच संख्या वाढत असल्याने साऱ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष कऱ्हाडवर केंद्रीत झाले आहे. कऱ्हाड तालुक्यातच संख्या झपाट्याने वाढत असल्याने साऱ्यांनीच आता हात टेकल्यासारखी स्थिती झाली आहे. दरम्यान यापुर्वी कऱ्हाड तालुक्यात एकाच दिवसात पहिल्यांदा १२, त्यानंतर तब्बल २४ आणि आज (गुरुवारी) १५ अशा मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढु लागली आहे.

त्यामुळे कोरोनाची साखळी काय तुटायलाच तयार नाही असे दिसत आहे. बाबरमाचीतुन कोरोनाची वनवासमाची, मलकापुर-आगाशिवनगरमध्ये पोचलेली ही
साखळी वाढतच चालली असल्याने प्रशासनासमोर काय करायचे हाच मोठा प्रश्न आहे.  आज (गुरुवारी) सकाळीच मलकापुर-आगाशिवनगर येथील एका  दोन वर्षीय चिमुकलीसह एका जेष्ठाला कोरोनाची बाधा झाल्याचे आरोग्य विभागाच्या
अहवालावरुन स्पष्ट झाले. तसेच वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयातील वाहनांवरील चालकाचा यामध्सये मावेश असून तो मलकापूर येथील रहिवाशी आहे. 

त्यानंतर लगेचच गुरुवारी दुपारीच तब्बल १४ रुग्ण कोरोना बाधीत झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालुतन धक्कादायक बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे कऱ्हाड शहरासह तालुकाही हडबडुन गेला आहे. दरम्यान कऱ्हाड तालुक्याची कोरोनाबाधित रुग्णांसंख्या वाढुन ती ८६ गेली आहे. दरम्यान दुपारी सापडलेल्या 18 रूग्णांपैकी 1३ रुग्ण कराड शहर आणि तालुक्यातील आहेत. अन्य पाच रुग्ण इतर तालुक्यातील आहेत

जिल्हाधिकाऱ्यांकडुन तातडीची बैठक....
 एकाच दिवशी तब्बल 18 रुग्ण सापडल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ.आबासाहेब पवार, पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, तालुका पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रकाश शिंदे तालुका आरोग्य अधिकारी संगीता देशमुख, अतिरीक्त आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल कोरबु यांच्यासह आरोग्य विभाग आणि पोलिस यंत्रणेची तातडीने बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी आरोग्य विभागाने राबवलेल्या उपाययोजनांची माहिती घेऊन यापुढे करायचा उपाययोजनेसंदर्भात काही सूचनाही केल्या.

दरम्यान, बुधवारी (ता. ६) पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात ९२ ,कोल्हापूर १६, सांगली ३५, रत्नागिरी १६ अशी कोरोनाबाधितांची संख्या होती. आज  तब्बल २१ रूग्ण वाढल्याने सातारा जिल्ह्यात कोरोनाची संख्या ११३ झाली आहे. परिणामी सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या चिंतेत भर पडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com