ब्रेकिंग : अवघ्या काही तासांत कराडला तीन रुग्ण पाॅझिटिव्ह; साताराची संख्या 21 वर

ब्रेकिंग : अवघ्या काही तासांत कराडला तीन रुग्ण पाॅझिटिव्ह; साताराची संख्या 21 वर
Updated on

कराड ः सातारा जिल्ह्यात काेराेनाचे एकूण 21 रुग्ण झाले आहेत. त्यापैकी 16 जणांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत दाेन जणांचा मृत्य झाला आहे तर तिघे काेविड 19 मुक्त झाले आहेत. दरम्यान आज (गुरुवार) अवघ्या काही तासांत तीन रुग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने कराड आणि मलकापूर येथे चिंतेचे वातावरण पसरले आहे.

कऱ्हाड जवळील मलकापुर परिसरातील आगाशिवनगमध्ये आज (गुरुवार) आणखी दोघांना तर वनवासमाची येथील एक महिलेला कोरोना विष्णाुची बाधा झाल्याचे आरोग्य विभागाकडुन आलेल्या अहवालावरुन स्पष्ट झाले. त्यामुळे कऱ्हाडमध्ये एकुण रुग्णांची संख्या नऊ झाली आहे तर उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या सात झाली आहे. एकाच दिवशी आज तब्बल तीन रुग्ण सापडल्याने शहरासह मलकापुर आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान कऱ्हाड तालुका हा सध्या कोरोनासाठी हॉटस्पॉटच बनला आहे.

सातारा जिल्ह्यात कऱ्हाड तालुक्यात बाधीत रुग्णांची संख्या वाढु लागली आहे. तालुक्यात पहिल्यांदाच तांबवे येथे बाधीत रुग्ण सापडला. त्याच्यावर उपचार करुन तो बरा झाल्यने त्याला घरी सोडण्यात आले आहे. त्यानंतर म्हारुगडेवाडी येथे मुंबईवरुन आलेला रुग्ण सापडला. त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्य झाला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील अन्य एकाला कोरोनाची बाधा झाली आहे. त्याचदरम्यान हजारमाचीत रेल्वेचा कर्मचारी बाधीत झाला. त्याच्यावर उपचार सुरु असतानाच चरेगाव आणि बाबरमाची येथे दोन रुग्ण सापडले. त्यानंतर तालुक्यातील वनवासमाची आणि आगाशिवनगर येथील दोघांना कोरोनाची लागण झाली. आता त्यांच्यापासुन रुग्णांची साखळी वाढु लागली आहे. आज संबंधितांच्या संपर्कातील आणखी तीन रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

त्यामध्ये मलकापुर-आगाशीवनगर परिसरातील दोन पुरुष तर वनवासमाचीतील पहिल्या रुग्णाच्या कुटुंबातील एका महिलेचा समावेश असल्याचे आरोग्य विभागाकडुन आलेल्या तपासणी अहवालातुन समोर आले आहे. आगाशिवनगर व वनवासमाचीतील संबंधित दोघे हे बाबरमाची येथील बाधीताच्या संपर्कात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान आझ सापडलेल्या मलकापुर-आगाशिवनगर परिसरातील संबंधितांच्या संपर्कातील कुटुंबीय आणि अन्य काही जणांना तपासणीसाठी ताब्यात घेण्याची कार्यवाही प्रशासन, आरोग्य विभागाने केली आहे. त्यामुळे कऱ्हाड शहरासह मलकापुर आणि तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान प्रशासनाने दिलेल्या माहितीनूसार कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासित 43 वर्षीय महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ही 43 वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. 

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 5, कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 27, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 4, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 8 व फलटण येथील 11 असे एकूण 55 रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे.  कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे मृत झालेल्या 5 महिन्याच्या बालकाचा अहवाल निगेटिव्ह असल्याचेही कळविण्यात आले आहे. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासातील 13 वर्षीय मुलाचा अहवाल अनिर्णित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यलय, पुणे यांनी कळविले आहे.  

22 एप्रिल रोजी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे बाधीत रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून 10 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.


सातारा जिल्ह्यातील माजी सैनिकांसाठी महत्वाची बातमी

Video : जिल्हाधिकारी म्हणाले सातारकरहाे आता वेळ आलीय; पुणे मुंबईकरांनाही इशारा

कोरोनाची संभाव्य साखळी टाळण्यासाठी कऱ्हाडकरांवर आली ही जबाबदारी

अटकेपुर्वीच वाधवानांच्या सुटकेचे रंगलंय राजकारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

how heirs apply for PM Kisan after death
Why are Sangli gram panchayat funds stalled?
Chandoli Sanctuary wildlife attack protest
Ramdas Athawale receives highway protest memorandum
Marathi News Esakal
www.esakal.com