धक्कादायक दूध विक्रेत्या कोरोनाबाधीतेस चक्क शहरातून चालवत नेले

धक्कादायक दूध विक्रेत्या कोरोनाबाधीतेस चक्क शहरातून चालवत नेले

कऱ्हाड ः कोरोनाबाधीत रूग्णाला रूग्णवाहिकेतून न नेता त्यांस चालवत नेले आहे. हा अजब प्रकार येथे उघडकीस आल्यानंतर त्याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे करण्यात आली आहे. शहरातील पॉझिटिव्ह  आढळलेल्या रुग्णाला रूग्णवाहिकेतून न नेता चालवत नेले आहे. त्याची सखोल चौकशी करून संबधितांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील मंगळवार पेठेतील प्रमोद पाटील यांनी केली आहे. 

गेल्या सहा दिवसांत कोरोनाची तपासणी झालेल्यांचा आज (गुरुवार) दुपारी सव्वा दोन वाजता अहवाल जाहीर झाला. त्यात मंगळवार पेठतील महिला पॉझीटिव्ह आढळून आली. ती महिला घरीच क्वारंटाईन होती. तीचा अहवाल पॉझीटिव्ह येताच तीला रूग्णालायत नेण्यात आले. तेही चक्क चालवत. तीच्या सोबत पालिकेचे कर्मचारी होती. ती गोष्ट उघडकीस येताच प्रमोद पाटील यांनी त्याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोग्य प्रशासनाने त्यांना तातडीने रूग्णालयात नेण्यासाठी रूग्णवाहीका उपलब्ध करून दिली नाही. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला शहरातून चालवत नेणे भितादायक आहे. शहरातील नागरिकांच्या दृष्टीने हिताचे नाही. शभर टक्के लॉकडाऊनमूळे नागरिक हैराण आहेत. त्यात पॉझीटिव्ह रूग्णास चालवत नेण्याच्या प्रकारामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. तालुक्यात कोरोनाची साखळी प्रशासन अपयशी ठरले असतानाच शहरात पॉझीटिव्ह रूग्णास चालवत नेण्याचा प्रकार गंभीर आहे. संशयितांना केवळ होम कवारन्टीन केले आहे. वास्तविक त्यांना हॉस्पिटलाईज करायला पाहिजे होते. मात्र तसे का केले गेले नाही. त्यात दोषी असणाऱ्या संबंधितावर योग्य कडक कारवाई करावी.

...म्हणून दुपारी तीनला पश्चिम महाराष्ट्र हादरला

पवारांच्या पावसतल्या सभेतील त्या कार्यकर्त्यास विधान परिषेदत संधी ?

पॉझीटिव्ह रूग्ण आणण्याची जबाबदारी नागरी आरोग्य केंद्राच्या नर्सची असते. त्यांनी तो रूग्ण आणणार आहोत. रूग्णवाहिका हवी आहे, अशी उपजिल्हा रूग्णालयास द्यायला हवी होती. मात्र तसे काहीच कोमी सांगितले नाही. त्या रूग्णास चालवत आणण्यात आले. रूग्ण प्रत्यक्ष उपजिल्हा रूग्णालयात आल्यानंतर रूग्ण आल्याचे आम्हाला सांगण्यात आले. ते योग्य नाही. वास्तिवक कोविड रूग्णांसाठी स्वंतत्र रूग्णवाहीका ठेवण्यात आली आहे. रूग्णांची माहिती उपजिल्हा रूग्णालयास कळाली की त्वरीत रूग्णवाहीका उपलब्ध करून दिली जाते असा खूलासा डॉ. प्रकाश शिंदे (वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रूग्णालय, कऱ्हाड) यांनी केला आहे. 


कराडमधील पहिली कोराेना बाधीत रुग्ण घराेघरी दूधाचा रतीब घालायाची 

शहरातील पहिला कोराेना बाधीत ठरलेली येथील मंगळवार पेठेतील महिला रूग्ण नक्की कोणाच्या संपर्कात आल्याने बाधीत ठरली आहे. संबधित महिला उपजिल्हा रूग्णालयातील कोरोनाबाधीत आरोग्य सेविकेच्या संपर्कात आल्याने बाधीत ठरली. संबधित महिला आरोग्य कर्मचाऱ्याची घरी बाधीत ठरलेली महिला दूधाचा रतीब घालण्यासाठी जात होती. त्यामुळे तीला बाधा झाली आहे. मात्र तीला नागरी आरोग्य केंद्राने 30 एप्रिललाचा शिक्का मारून क्वारंटाईन केले होते. त्याबरबोर तीला बाहेर पडण्यास मज्जाव केला होता. त्या महिलेच वय जास्त अशल्याने ती हायरिस्क मधील होती. तीच महिला सध्या कोरोनाबाधीत ठरली आहे. संबधित महिला शहरातील तब्बल तीस वेगवेगळ्या घरात दूधाच रतीबासाठी जात होती. मात्र आठ दिवसापाून ती रतीबास गेलेली नाही. 

त्यापूर्वी तीच्या संपर्कात कोण आले आहे, त्याचा प्रशासन शोध घेत आहे. संबधित महिला तीच्या राहत्या घरी भाजी विकत होती, अशी माहिती प्रशानास मिळाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधीत ठरलेली महिला व त्या महिलेच्या संपर्कातील तब्बल अठरा लोकांना क्वारंटाईन केले आहे. तीच्या संपर्कातील अन्य लोकांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्याचा धोका कऱ्हाडकरांसमोर सध्या तरी दिसतो आहे. कोरोनाचा हॉस्टॉट बनलेल्या कऱ्हाड तालुक्यात 85 कोरोनाबाधीतांची संख्या पोचली आहे. कोरोनाची ती लागण अद्यापही मुल कऱ्हाड शहरात झाली नव्हती. 30 एप्रिलला येथील उपजिल्हा रूग्णालयातील सहा आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्याशिवाय अन्य येथील रूक्मीणीनगर येथे माहेरी आलेल्या महिलेस कोरोनाची लागण झाली होती. ती महिला उपजिल्हा रूग्णलायातील नर्सच्या संपर्कात आल्याने बाधीत ठरली होती. त्या आरोग्य सेविकांच्या संपर्कात कोण कोण आले आहे, याचा शोध सुरू आहे. तशी स्थिती असतानाच शहरातील मंगळवार पेठेत आज कोरोनाबाधीत महिला नव्याने सापडली आहे. त्यामुळे शहर हादरले आहे. शहराच्या मध्यवस्तीत महिला राहते. मंगळवार व गुरूवार पेठेच्या हद्दीवर त्या महिलेचे घर आहे. ती सापडल्याने भाजी मंईसह मंगळवारसह, गुरवारपेठेतील रहवाशांचे धाबे दणाणले आहेत. त्या दोन्ही पेठा सील करण्यात येणार आहेत. तेथे घरोघरी पालिकतर्फे आरोग्य तपासणीही होत आहे. कोरोनाबाधीत ठरलेली महिला उपजिल्हा रूग्णालयातील कोरोना बाधीत ठरलेल्या आऱोग्य सेविकाच्या साखळीतील आहे. ती महिला त्या आरोग्य सेविकेला दूधाचा रतीब घालण्यासाठी जात होती. त्यातूनच तील बाधा झाली आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मंगळवार पेठेतील बाधीत ठरलेली महिला शहरातील तीसहून अधिक अनेक घरात दूधाचा रतीब घालण्यासाठी जात होती. त्यामुळे प्रशासनाची काळजी अधिक गडद झाली आहे. त्याचा शोध प्रशासकीय पातळीवर घेण्याचे काम सुरू आहे. सध्या तरी ती महिला राहते तो भाग प्रशासनाने सील केला आहे. सकाळी दूधाचा रतीब घातल्यानंतर ती महिला दिवसा भाजी विकण्याचेही काम घरात राहूनच करत होती, अशीही माहिती प्रशासकीय पातळीवर मिळाली आहे. त्याची खातरजमा करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे कऱ्हाडकरांसाठी ती गोष्ट धोकादायक ठरते आहे. 


मुळ कऱ्हाडची पहिला बाधीत 

कऱ्हाड तालुक्यात 85 कोरोनाबाधीत सापडले आहेत. मुळ शहरात कोरोनाची एन्ट्री नव्हतीच त्यामुळे कऱ्हाडला चहूबाजूनी कोरोनाने ग्रासले होते. येथील उपजिल्हा रूग्णालायतील पाच आरोग्य सेविका व एका कर्मचाऱ्यास बाधा झाली. त्यानंतर त्याच साखळीतील वाखाण भागातील एका महिलेस कोरोना झाला. सहापैकी तीन महिला बाहेर राहतात. अन्य तीन महिला बाहेरील आसून त्या कॉटेजच्या क्वार्टसमध्ये राहतात. वाखाण भागात सापडलेली बाधीत महिला माहेरवासीन आहे. त्यामुळे मंगळवार पेठेतील आज बाधीत ठरलेली महिला ही मुळची कऱ्हाडची पहिली कोरोना बाधीत महिला ठरली आहे.

थांबा! व्हॉट्‌सऍपवर पाेस्ट करण्यापुर्वी हे वाचा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com