Coronavirus : घरात बस भावा ! नाय तर साताऱ्यात रेड झाेनची हवा

Coronavirus : घरात बस भावा ! नाय तर साताऱ्यात रेड झाेनची हवा

सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे  कोरोनाबाधित रुग्णांचा निकट सहवासित असलेल्या 17 वर्षीय युवकास या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. आता शनिवारी (ता.18) त्याच्याशी  घशातील स्त्रावाचा नमुना पुर्नतपासणीसाठी बी.जे. वैद्यकीय महविद्यालय पुणे येथे पाठविण्यात आला होता. या तपासणीत या युवकांचा अहवाल कोरोना (कोव्हीड19) बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 


दरम्यान क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या 9 तसेच उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल असणाऱ्या 4 अशा एकूण 13 अनुमानित रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या कोरोनाबाधिताच्या निकट सहवासित 13 नागरिकांचे 14 दिवसानंतरच्या पुर्नतपासणीसाठी घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही  डॉ. गडीकर यांनी दिली आहे. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या कोरोना बाधित रुग्णाचा 14 दिवसांनंतरचा घशातील स्त्रावाचा दुसरा नमुना बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे पाठविण्यात येत असल्याची माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.

ब्रेकिंग : सातारा जिल्ह्यात दाेन युवकांना कोरोनाची लागण 

Coronavirus : लॉकडाऊनबाबत महत्त्वाची बातमी; सरकारकडून तीन झोन घोषित

Video : 'या' गावातील पाच हजार कुटुंबाची चिंता वाढली 

लाॅकडाऊनबाबत साताराचे जिल्हाधिकारी म्हणाले...

सर्वाधिक रुग्ण असणारे जिल्हे हे रेड झाेनमध्ये समाविष्ट केले जातात. सातारा जिल्ह्याचा आॅरेंज झाेनमध्ये समावेश झाला हाेता. त्यावेळी रुग्ण संख्या हाताच्या बाेटावर माेजण्याइतकी हाेती. आज मितीस 14 रुग्णांची संख्या झाली. यामुळे सातारा जिल्ह्याचे रेड झाेनकडे वाटचाल हाेती की काय अशी चिंता व्यक्त हाेत आहे. 


दिनांक 19.4.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी
 1.    क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय , सातारा    379
2.    कृष्णा हॉस्पीटल, कराड-    276
3.    एकूण दाखल -    655
    प्रवासी-120, निकट सहवासीत-403, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-132 = एकूण 655
4.    14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले-    10
5.    कोरोना नमुने घेतलेले एकूण-    665
6    कोरोना बाधित अहवाल -    13
7.    कोरोना अबाधित अहवाल -    614
8.    अहवाल प्रलंबित -    28
9.    डिस्चार्ज दिलेले-    617
10.    मृत्यू    2
11.    सद्यस्थितीत दाखल-    36
12.    आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 18.4.2020) -    1065
13.    होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती -    1065
14.    होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती -    654
15.    होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती –    411
16.    संस्थेमध्ये अलगीकरण केलेले-    173
17.    आज दाखल    0
18.    यापैकी डिस्जार्ज केलेले-    89
19    यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात-    0
20.    अद्याप दाखल -    90

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com