esakal | कोरोना इफेक्ट : सातारा शहरासह नऊ ग्रामपंचायतींचा परिसर सील
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Collector

या परिसरात शिवराज पेट्रोलियम, कदम पेट्रोलियम राधिका रोड सातारा, केतन दोषी, सातारा पेट्रोलियम, शाहू स्टेडीयम शेजारी सातारा हे पेट्रोलपंप वगळून इतर सर्व पेट्रोल पंप बंद राहतील.

कोरोना इफेक्ट : सातारा शहरासह नऊ ग्रामपंचायतींचा परिसर सील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोनाचा संसर्ग झालेला रूग्ण सातारा शहरात सापडल्याने सातारा शहरासह परिसरातील नऊ ग्रामपंचायती व त्रिशंकु परिसर आज (बुधवारी ) मध्यरात्रीपासून सील करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी घेतला आहे. त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवा वेगळा उर्वरित सर्व काही बंद राहणार आहे. दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

कऱ्हाड पाठोपाठ सातारा शहरातही आज कोरोनाबाधित महिला सापडल्याने जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सदरबझार परिसरातील ही महिला जिल्हा रूग्णालयात एक्स रे तंत्रज्ञ म्हणून काम करत होती.

हेही वाचा ः भावाकडून बहिणीचा चाकूने भोसकून खून

आज तीचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने सदरबझार परिसरात तिच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध आरोग्य विभागाने सुरू केला आहे. त्यामुळे सदरबझार परिसरातील एक किलोमीटर परिसर प्रतिबंधात्मक घोषित करून तीन किलोमीटर परिघात बफर झोन करण्यात आला आहे.

आवश्य वाचा ः मुंबईहुन आलेल्या जावयाला सासुरवाडीच्या ग्रामस्थांचा विरोध

दरम्यान, या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातारा तालुक्यातील खेड, विलासपूर, गोडोली, शाहुपूरी, म्हसवे, सैदापूर, वाढे, कोडोली, संभाजीनगर  या ग्रामपंचायतींचे क्षेत्र तसेच सातारा नगरपालिका क्षेत्र व त्रिशंकू क्षेत्र सील करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंटेनमेंट झोनमध्ये कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय त्यांनी घेतला आहे. हे प्रतिबंधित क्षेत्राचे आदेश आज (बुधवार) मध्यरात्री बारा वाजल्यापासून ते पुढील आदेशापर्यंत मनाई आदेश जारी राहणार आहेत. या संपूर्ण क्षेत्रामध्ये कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी एका वेळेस दोनपेक्षा जास्त व्यक्तींना जमा होणेस सक्त मनाई करण्यात आली आहे.

 या प्रतिबंधित क्षेत्रात दवाखाने, हॉस्पीटल, नर्सिंग होम वगळून इतर सर्व प्रकारची दुकाने उघडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील घरगुती गॅस सिलेंडर घरपोच वितरण करण्यास सुट असेल. तसेच औषधे व दुध घरपोच पुरविण्याबाबत उप विभागीय अधिकारी यंत्रणा उभारतील त्याप्रमाणे पुरविण्यात येईल.

या परिसरात शिवराज पेट्रोलियम, कदम पेट्रोलियम राधिका रोड सातारा, केतन दोषी, सातारा पेट्रोलियम, शाहू स्टेडीयम शेजारी सातारा हे पेट्रोलपंप वगळून इतर सर्व पेट्रोल पंप बंद राहतील. या पेट्रोलपंपावर अत्यावश्यक सेवेसाठी नियुक्त केले अधिकारी व कर्मचारी यांच्या वाहनांना इंधनपुरवठा करण्यात येणार आहे. या आदेशातून अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे शासकीय, निम शासकीय, खाजगी अधिकारी  कर्मचारी वगळणेत येत आहेत. सर्व शासकीय कार्यालये चालू राहणार आहेत. तसेच    शासन मान्य शिवभोजन थाळीची सूविधा सुरू राहणार आहे. 


या परिसरात यापुर्वी वेगवेगळया विभागामार्फत देण्यात आलेले सर्व पास रदद करण्यात आले आहेत. यापूर्वी नियुक्त केले अधिकारी, कर्मचारी यांचेपैकी अत्यावश्यक असलेले अधिकारी- कर्मचारी यांनाच उपविभागीय दंडाधिकारी तथा इन्सीडंट कमांडंर सातारा यांनी स्वतंत्र नव्याने ओळखपत्र तसेच वाहन परवाना वितरीत करणार आहेत. 
या आदेशाचे पालन न करणाऱ्या विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायद्यातील तरतूदीनुसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.