जिल्हाधिकाऱ्यांनी दिला म्हासोली ग्रामस्थांना कानमंत्र

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

काेराेना बाधीतांच्या संपर्कात आला असाल तर आरोग्य तपासणीसाठी स्वतःहुन पुढे या, कंटटमेंट झोनमधील नियमांचे पालन करुन स्वतःची सुरक्षा स्वतःच करा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ग्रामस्थांना केले.

कऱ्हाड : तालुक्यातील म्हासोली येथील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढु लागली आहे. एक-दोन करत तेथे तब्बल रुग्णांची १२ संख्या झाली आहे. कमी कालावधीत तेथे वाढलेल्या रुग्णसंख्येचा विचार करुन जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी थेट म्हासोली गाठली. तेथील ग्रामस्थांना संबंधित बाधीतांच्या संपर्कात आला असाल तर आरोग्य तपासणीसाठी स्वतःहुन पुढे या असे आवाहन करुन जिल्हाधिकारी सिंह यांनी कंटटमेंट झोनमधील नियमांचे पालन करा, असे आवाहन ग्रामस्थांना केले.

कऱ्हाड तालुक्यातील उंडाळे विभागातील म्हासोली येथे आळंदी येथुन प्रवास करुन गावी आलेल्या एकाला कोरोनाची बाधा झाली. त्याच्या संपर्कातील आणखी दोघांना कोरोनाची बाधा झाली. तर काल त्यामध्ये तब्बल नऊ रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे वनवासमाची सारखी तेथील रुग्ण संख्या वाढुन नवी साखळी होण्याचा धोका विचारात घेवुन जिल्हाधिकारी सिंह, पोलिस अधिक्षक सातपुते यांनी आज सकाळी-सकाळीच म्हासोली गाठली. संबंधित ठिकाणच्या परिस्थितीची आणि केलेल्या उपायोयजनांची प्रांताधिकारी उत्तम दिघे, पोलिस उपाधिक्षक सुरज गुरव, तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, तालुका आरोग्य अधिकारी संगीता देशमुख, येवती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडुन त्यांनी माहिती घेतली. त्यानंतर सरपंच, उपसरपंच, मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांनी राबवलेल्या उपाययोजनांची माहिती घेवुन त्यांनी ग्रामस्थांना संबंधित बाधीतांच्या संपर्कात आला असाल तर आरोग्य तपासणीसाठी स्वतःहुन पुढे या, कंटटमेंट झोनमधील नियमांचे पालन करुन स्वतःची सुरक्षा स्वतःच करा, असे आवाहन ग्रामस्थांना केले.

सातारा : पावसाळा लांबल्यास पाणीटंचाई 

बिदाल : क्षणांत हाेत्याचे नव्हते झाले

नशीब बलवत्तर : मायलेकींसह तिघे वाचले

गुजरातने पाठविला...कर्नाटकने नाकारला...महाराष्ट्राने स्विकारला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara District Collector Visited Mahsoli