esakal | गुजरातने पाठविला...कर्नाटकने नाकारला...महाराष्ट्राने स्विकारला
sakal

बोलून बातमी शोधा

गुजरातने पाठविला...कर्नाटकने नाकारला...महाराष्ट्राने स्विकारला

कर्नाटकातील असीफ सय्यद यांच्या मृतदेहाची तब्बल चोवीस तासापेक्षा जास्तकाळ हायवेवर सुरू असलेली हेळसांड कऱ्हाडच्या मुस्लीम समाजातील नागरीकांनी दाखवलेल्या माणुकीमुळे अखेर मध्यरात्री कऱ्हाडच्या कब्रस्तानच्या मातीत विसावली. 

गुजरातने पाठविला...कर्नाटकने नाकारला...महाराष्ट्राने स्विकारला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : त्यांचे मुळगाव कर्नाटक... ते नोकरी निमित्ताने गुजरात स्थायिक होते. मात्र हार्ट अॅटकने त्यांचे गुजरातला परवा रात्री निधन झाले. असिफ लतीफ सय्यद (वय 54) असे त्यांचे नाव. गुजरातला निधनानंतर त्यांचा मृतदेह कागदोपत्री सोपस्कर करुन कर्नाटकला रवाना केला. मात्र लाॅकडाऊनच्या नियमामुळे सय्यद यांचा मृतदेह त्यांच्या मुळगावी कारावारला पोचलाच नाही. कर्नाटक पोलिसांनी त्यांना एन्ट्री नाकारली. मृतदेह घेवून रूग्णवाहीका हायवेवर मध्यरात्री पुन्हा कोल्हापूरला आली. तेथील पोलिसांनाही त्यांना प्रवेश नाकरला. कर्नाटकच्या बाॅन्ड्रीपासून सुरू असलेली त्या मृतदेहाची हेळसांड अखेर कऱ्हाडच्या मुस्लीम समाजाने दाखवलेल्या माणुसकीने येथील इदगाह मैदानात अखेर विसावली.
 

असीफ सय्यद नोकरी निमित्त गुजरातला होते. कर्नाटकातील कारवार हे त्यांचे मुळगाव आहे. त्यांचे परवा(ता.17) रात्री हार्ट अॅटकने निधन झाले. सय्यद यांचे कोणीच नातेवाईक त्यांच्यी त्यावेली जवऴ नव्हते. सरळे कारवार या मुऴगावी होते. त्यांना ती माहिती देण्यात आली. गुजरात मधील सय्यद यांचे मित्र व तेथील सामाजिक कार्यकर्ते मुबारक व मकबूल यांनी त्यांच्या मृतदेहाचे सारे कागदपत्री सोपस्कर पूर्ण करून तो मृतदेह ताब्यात घेतला. मृत्यूचा दाखला, दवाखान्याची परवानगी, राज्य ओलांडण्याची परवानगी घेवून सय्यद यांना रूग्णवाहीकेतून घेवून मुबारक व मकबुल कारवार या सय्यक यांच्या मुळगावी निघाले. राज्यात प्रेवश करताना त्यांना काहीही अडचण आली नाही. मात्र कर्नाटकात मात्र त्यांना प्रवेश नाकारला. कोगनळी येथे कर्नाटकच्या सीमेवर सय्यद यांना घेवून निघालेली रूग्णवाहीका अडविण्यात आली. कागदोपत्री पुर्तता असताना, मुळच्या कर्नाटकातील नागरीकालाच कर्नाटक पोलिसांनी प्रवेश नाकरला. नुसता प्रेवशच नाकारला नाही. तर ती रूग्णवाहीका तेथून उलट पिटाळून लावत गुजरातला परतण्याचे आदेश दिले. 

कर्नाटकच्या सीमेवरून परतलेल्या रूग्णवाहीकेतील मुबारक यांनी कोल्हापूरला मुस्लीम बोर्डाचे गणी अजरेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांना वस्तूस्थिती सांगितली. कागदपत्रेही दाखवली. त्यावेळी आजरेकर यांनी सय्यद यांच्या कुटूंबियाच्या लेखी समंतीने बागल चौकातील दफनभूनीत विधी करण्यास मंजुरी दिली. त्याबाबत त्यांनी कोल्हापूर पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक देशमुख कर्नाटक पोलिसांशी बोलत असतानाच तोपर्यंत कर्नाटक पोलिसांनी ती  रुग्णवाहीका हायवेवरुन थेट पेठवडगाव येथे आणून सोडली होती. तोपर्यंत सांगलीचीही हद्द आली होती. त्यावेली कोल्हापूरचे आजरेकर यांनी कऱ्हाडच्या इकबाल संदे यांच्याशी संपर्क साधला. वस्तूस्थिती सांगून ती रूग्मवाहीका कऱ्हाडकडे येत असल्याचे स्पष्ट केले.

श्री. संदे यांनी त्याची माहिती कब्रस्तान ट्रस्टींना दिली. ज्येष्ठ नगरसेवक फारूक पटवेकर यांनी त्यात पुढाकार घेतला. त्यांना सामाजिक कार्यकर्ते इरफान सय्यद, हाजी बरकत पटवेकर, साबीरमिया मुल्ला, झाकीर शेख यांनी पुढाकार घेतला. कर्नाटकच्या सय्यद यांची कागदपत्र पाहिली. त्यांचा पोस्ट मार्टम अहवाल, मृत्यूची दाखला व त्यांच्या नातेवाईकांची लेखी परवानगी पाहिल्यानंतर मध्यरात्री अडीचच्या सुमारास येथील दफनभूमीत अंतीम विधी झाले. कर्नाटकातील असीफ सय्यद यांच्या मृतदेहाची तब्बल चोवीस तासापेक्षा जास्तकाळ हायवेवर सुरू असलेली हेळसांड कऱ्हाडच्या मुस्लीम समाजातील नागरीकांनी दाखवलेल्या माणुकीमुळे अखेर मध्यरात्री कऱ्हाडच्या कब्रस्तानच्या मातीत विसावली. 

ब्रेकिंग न्यूज : आता हाॅटेल ढाब्यांवरील चवीचे पदार्थही मिळणार

सातारा : कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांची स्ट्रॅटजी

पृथ्वीराज चव्हाणांनी करुन दाखवलं 

शैक्षणिक स्‍पर्धेत टक्‍केवारीपासून सावधान..!