अकरा वर्षाच्या मुलास कोरोनाची बाधा; सातारा शहर चिडीचूप

अकरा वर्षाच्या मुलास कोरोनाची बाधा; सातारा शहर चिडीचूप
Updated on: 

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यात सुरु झालेली कोरोनाची साखळी थांबायलाच तयार नाही. आज (बुधवारी) कापील येथील आणखी एका 11 वर्षाच्या मुलाला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाकडे आला आहे. त्यामुळे कऱ्हाड तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढून 31 झाली आहे. दरम्यान संबंधितांच्या संपर्कातील संशयीतांना तपासणीसाठी नेण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यात कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक कोरोना बाधीत रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापुर जिल्ह्याचे लक्ष कऱ्हाडकडे लागले आहे. तालुक्यात बाबरमाचीतील रुग्णांपासुन सुरु झालेली साखळी आजही सुरु राहिल्याचे अहवालावरुन समोर आले आहे. बाबरमाचीत जरी रुग्ण सापडले नसले तरी त्यामुळे बाधीत झालेल्या वनवासमाची आणि आगाशिवनगर येथील बाधीतांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ती दोन्ही गावे कोरोना हॉटस्पॉटच बनली आहेत.

संबंधित दोन्ही ठिकाणी आज (बुधवारी) कोरोना बाधित सापडले नाहीत. मात्र याच साखळीतुन बाधीत झालेल्या कापील येथील एकाच घरातील दुऱ्यालाही लागण झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरुन आज (बुधवारी) समोर आले आहे. दरम्यान संबंधित मुलगा हा 11 वर्षाचा मुलगा आहे. आता तालुक्यातील बाधीतांची संख्या सध्या 31 वर पोचली आहे. दिवसेंदिवस संख्या वाढत असल्याने तालुक्याच्या चिंतेतही भर पडत आहे.

दरम्यान क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील एक 36 वर्षीय महिला आरोग्य कर्मचारी देखील काेविड 19 ने बाधित झाल्याचा अहवाल बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. आता सातारा जिल्ह्यात 33 रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत 8 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. 

आज क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 34, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 18, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे 11 असे एकूण 63 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

प्रशासनाने  सातारा शहरातील सदरबाजार व लगतचा तीन किलोमीटर परिसरात बफर क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. साता-यात सदरबाजार परिसरात कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव,रोखण्यासाठी उपाययोजना केल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

Video : फॅन्टास्टिक; बाळाने आणि आज्जीने धुडकाविले त्याला

कूठे गेली माणुसकी : हॉटस्पॉट कऱ्हाडात औषधांसाठी पन्नास संपर्क क्रमांक; एकही लागत नाही

सातारा शहरात कोरोनाचा शिरकाव; सदरबझारमधील महिला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Sangli ACB trap exposes a ₹50,000 bribe case
Sunil patil and Sonali Avati
Marathi News Esakal
www.esakal.com