धक्कादायक : वाढदिवसादिवशीच चौदा वर्षांची मुलगी कोरोनाबाधित

धक्कादायक : वाढदिवसादिवशीच चौदा वर्षांची मुलगी कोरोनाबाधित

लोणंद (जि.सातारा) : गेली 45 दिवस लोणंद शहराच्या वेशीवर तरडगाव व तांबवे येथे येऊन धडकलेल्या कोरोनाने अखेर लोणंद शहरात शिरकाव केला. मूळची तांबवे (ता. फलटण) येथील आणि दक्षिण कोरियात परतल्यावर कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झालेल्या एका युवतीच्या संपर्कात आलेली येथील चौदा वर्षांची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा वैद्यकीय अहवाल बुधवारी (ता.6) प्राप्त झाला. त्यामुळे येथे खळबळ उडाली आहे.
 
प्रशासनाने त्याची तातडीने दखल घेत लोणंद शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केल्याने शहराच्या सर्व सीमा त्वरित सील करण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण शहर व गोळेगावही पुढील 14 दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाउनमध्ये गेले आहे, तर बफर झोनमधील पाडेगाव (ता. खंडाळा), बाळुपाटलाचीवाडी, मरिआईचीवाडी, बावकलवाडी, पिंपरे बुद्रुक, खेड बुद्रुक, पाडेगाव (ता. फलटण), कोरेगाव, कापडगाव, तरडगाव, तांबवे आदी दहा गावे लॉकडाउन केली आहेत.
 
तांबवे येथील कोरोनाबाधित उच्च शिक्षित एक युवती दोन महिने आपल्या तांबवे येथील घरी राहून 28 एप्रिल रोजी मुंबईतून पुन्हा दक्षिण कोरियाला विशेष विमानाने परतली. त्यानंतर ती तेथे कोरोनाबाधित आढळल्यावर लोणंदच्या मध्यवस्तीतील एका तीन मजली इमारतीत राहणाऱ्या तिच्या संपर्कातील सहापैकी अन्य पाच जणांचे वैद्यकीय रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मात्र, चौदा वर्षांच्या या एका मुलीचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट बुधवारी प्राप्त झाला. दरम्यान या मुलीला सातारा येथे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले, तर हाय रिक्‍स कॉन्टॅक्‍टमधील 13 जणांना शिरवळ व फलटण येथे क्वारंटाइन केले आहे, तर लो रिक्‍स कॉन्टॅक्‍टमधील 20 जणांना होम क्वारंटाइन केले आहे.
 
खंडाळ्याचे तहसीलदार दशरथ काळे, फलटणचे पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, खंडाळा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील, लोणंदचे मुख्याधिकारी हेमंत ढोकले, लोणंदचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी, लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. प्रशांत बागडे आदींनी शहरातील संबंधित परिसराला भेट
देऊन आढावा घेतला. 

थांबा! व्हॉट्‌सऍपवर पाेस्ट करण्यापुर्वी हे वाचा

राष्ट्रीयीकृत बॅंकांची आर्थिक वर्षाअखेर कधी?

वाढदिनी अशाही शुभेच्छा... 

कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल येथील मुलीबाबत आल्यावर सर्वांच्या काळजाचा थरकाप उडाला. एवढेच नव्हे तर तिच्या वाढदिवसादिवशीच तिला रुग्णवाहिकेतून सातारा येथील रुग्णालयात दाखल व्हावे लागल्याचा प्रसंग आज परिसरातील रहिवाशांनी अनुभवला. वाढदिवसादिवशीच तिला कोरोनाच्या तावडीत अडकावे लागल्यानंतर अनेकांनी मात्र घरांच्या खिडकीत आणि गच्चीत उभे राहून लवकर बरे होऊन परत या, असे म्हणत शुभेच्छाही दिल्या.

सातारा, कऱ्हाडात निर्बंधावर जिल्हाधिकारी ठाम, ग्रामीण भागाला दिलासा

बाप रे ! हे काय चाललंय सातारा जिल्ह्यात

हजाराे परप्रांतीयांनी गावी जाण्यासाठी नाेंदणी केली आहे. त्या सर्वांना माेफत प्रवासाची संधी उपलब्ध झाली आहे. त्यासाठी बातमीमधील संपर्क क्रमांकावर नाव नाेंदवविणे आवश्यक आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com