Lockdown : दारू दुकानमुक्त तालुक्यातच भट्ट्या फोफावल्या

Lockdown : दारू दुकानमुक्त तालुक्यातच भट्ट्या फोफावल्या

मेढा (जि.सातारा) : लॉकडाउनमध्ये सर्वत्र दारू दुकाने बंद असताना जावळी तालुक्‍याच्या दक्षिणेकडील डोंगरमाथ्यावर आपटी मुऱ्यासारख्या काही मुऱ्यांवर गावठी दारूच्या भट्ट्या सुरू झाल्या असून, त्यातून दारू काढून विक्रीचा धंदा फोफावला आहे. दारू दुकानमुक्त असलेल्या तालुक्‍यात हा प्रकार रासरोसपणे सुरू आहे.
 
दारूविक्रेत्यांना सध्या चढा भाव मिळून ते मालामाल होत आहेत. व्यसनी लोक उन्हातान्हात दारूसाठी भटकंती करत एक दोन नव्हे, तर तब्बल 15 ते 20 किलोमीटर अंतर पायी जात आहेत. गावठी दारूविक्रीमुळे परगावावरून ये- जा करणाऱ्यांमुळे स्थानिक ग्रामस्थ वैतागले आहेत. त्यामुळे गावठी दारू तयार करून विकणारे व खरेदीसाठी येणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. दारू दुकानमुक्त असलेला तालुका म्हणून राज्यासह देशात जावळी तालुक्‍याचा वेगळा नावलौकिक आहे. या तालुक्‍यात कुठेच दारू मिळत नाही. मात्र, काही ठिकाणी चोरी छुपके दारूविक्री होताना दिसत होती. मात्र, लॉकडाउनपासून आणि पोलिसांनी ठेवलेल्या करड्या नजरेमुळे तालुक्‍यात अवैध दारूविक्री पूर्णपणे बंद ठेवण्यात पोलिसांना यश आले होते. मात्र, आता दक्षिणेकडील काही निवडक मुऱ्यावर दारूविक्री होत आहे. त्यासाठी काही जण मेढा परिसरातील गावापासून ते अगदी डोंगराच्या पालिकडून वाकी परिसरातून लोक दारूसाठी आपटी मुरा परिसरात पोचत आहेत. त्यामुळे दारूड्यांची सोय चांगलीच होत आहे. त्यांना पूर्वी शंभर रुपयांना मिळणारी प्लॅस्टिकची एक मोठी बाटली 300 ते 500 रुपयांना पडत आहे. काही जण मोठ कॅन डोक्‍यावरून नेऊन चढ्या भावाने दारू विकत असल्याचे समजते. 
साधारणपणे प्रतिदिवस दोन ते तीन बॅलर म्हणजे 600 ते एक हजार लिटर दारू विकली जाते. उलट मागणी जास्त आणि पुरवठा कमी पडत असल्याने पुन्हा गावठी भट्ट्या सुरू होण्याची शक्‍यता आहे. 
 
दरम्यान, गावठी हातभट्या, कुठे कुठे चोरून सुरू असलेली दारूविक्री तातडीने बंद करा. हे जीवघेणे असून, संबंधितांवर कडक कारवाई करा, अशी मागणी व्यसनमुक्त युवक संघाचे माजी राज्यध्यक्ष विलासबाबा जवळ यांनी केली आहे. 

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी माजी सैनिकाचा पुढाकार; सकाळ रिलीफ फंडा ला दिली मदत

सलून व्यावसायिक आणि त्यांच्या ग्राहकांसाठी महत्वपुर्ण बातमी

रामायण, महाभारत बरोबरच ‘या’ मालिकाही सुरू करा : पृथ्वीराज चव्हाण


कोरोना महामारीच्या पार्शभूमीचा गैरफायदा घेऊन अवैध धंदे, दारू व गावठी दारू, तसेच कोठे विक्री होत असेल तर थेट पोलिस ठाण्याला कळवा. त्यांची नावे गोपनीय ठेऊ, मात्र संबंधितांवर अत्यंत कठोर कारवाई करणार. 
- नीलकंठ राठोड, सहायक पोलिस निरीक्षक मेढा 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com