सातारा जिल्ह्यातील 'या' तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

सातारा जिल्ह्यातील 'या' तालुक्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
Updated on

कास (जि. सातारा)  जावळी तालुक्‍यात आढळलेल्या सहा रुणांपैकी पहिले तीन रुग्ण असलेले वडील, मुलगा व चुलत भाऊ असे कोरोनामुक्त झाले असून, त्यांच्या संपर्कातील तीन जणांचे अहवाल अद्याप बाकी आहेत. त्यांचेही चित्र लवकरच स्पष्ट होणार असल्यामुळे जावळी तालुका कोरोनामुक्तीच्या दिशेने पावले टाकत असल्याचे दिसून येत आहे. 

अद्याप उर्वरित तीन कोरोनाबाधित व तिसरा कोरोनामुक्त झालेल्याच्या निकट सहवासातील 42 जण क्वारंटाइनमधे असून, त्यांच्यातून कोणी पॉझिटिव्ह न आल्यास ही साखळी तुटण्यास मदत होणार आहे. या 42 जणांपैकी 14 जणांच्या प्रथम टेस्ट निगेटिव्ह आल्या असून, अद्यापही 28 जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. या 28 जणांचे प्रथम व बाकी 42 जणांचे 14 दिवसानंतरचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास जावळी कोरोनामुक्त होणार आहे. 

पाच एप्रिल रोजी निझरे येथील खासगी कारचालक कोरोना पॉझिटिव्ह आल्यापासून "कोरोना'ची जावळीतील साखळी सुरू झाली. या पहिल्या रुग्णाच्या संपर्कातील 47 जणांना क्वारंटाइन केले होते. त्यातील म्हाते मुरा येथील एक जण पॉझिटिव्ह आला. यातील 46 जणांना आजपर्यंत घरी सोडण्यात आले आहे. त्यानंतर दोन दिवसांत त्याचा मुलगा पॉझिटिव्ह आला. त्याच्या संपर्कातील 27 जणांना क्वारंटाइन करून त्यांच्या टेस्ट घेतल्या. त्यामधे पुन्हा दोन जण पॉझिटिव्ह आले. क्रिकेट खेळण्याच्या निमित्ताने हे दोन्ही युवक संपर्कात आले होते. त्यामधील 25 जणांना घरी सोडले आहे. पुन्हा या दोघांच्या संपर्कातील 12 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यापैकी 11 जण निगेटिव्ह असून, एक रिपोर्ट बाकी आहे. यानंतर पहिल्या टॅक्‍सी चालकाच्या संपर्कातील म्हाते मुरामधील युवक 19 एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला आणि ही साखळी निझरे गाव सोडून पहिल्यांदाच तालुक्‍याबाहेरील गावात गेली. या युवकाच्या संपर्कातील म्हाते मुरा व निपाणी मुरामधील 17 जणांना क्वारंटाइन करण्यात आले. यामध्ये पुन्हा एक तीन वर्षांचे बालक पॉझिटिव्ह आले. या 17 पैकी तीन रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, 14 जणांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. म्हाते मुरामधील लहान मुलाच्या संपर्कातील पुन्हा 13 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. 
या 13 जणांचे रिपोर्टही बाकी आहेत. एकूण आतापर्यंत 117 जण या कोरोना साखळीत अडकले होते. यापैकी 72 जणांना घरी सोडण्यात आले असून, तीन कोरोनामुक्त खावली येथील विलगीकरण कक्षात 15 दिवस ठेवले जाणार आहेत. अद्याप उर्वरित तीन कोरोनाबाधित व तिसऱ्या कोरोनामुक्त झालेल्याच्या निकट सहवासातील 42 जण "पॉझिटिव्ह-निगेटिव्ह'च्या चक्रात असून, या 42 जणांचे रिपोर्ट कसे येतात, 
यावरच जावळीतील "कोरोना'ची वाटचाल स्पष्ट होणार आहे. 

मेढ्यासह 28 गावांत गर्दीला आळा 

संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने जावळी तालुक्‍यातील मेढा शहरासह 28 गावे पाच दिवसांपासून पूर्ण लॉकडाउन केल्याचा चांगला फायदा होऊ लागला असून, मेढ्यासह इतर गावांत होणाऱ्या अनावश्‍यक गर्दीला आळा बसलेला आहे. तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, सहायक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड, तालुका आरोग्य अधिकारी भगवान मोहिते परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.

ए भावा...चल घेऊ पुढाकार आपल्या साताऱ्यासाठी 

कोरोनानंतर पश्‍चिम महाराष्ट्रापुढे हे असेल संभाव्य संकट

ब्रेकिंग : सातारा जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित कऱ्हाडला; केंद्रीय पथक करणार पाहणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why is kharif sowing delayed in Sangli?
Sangli Satara MLC election result 2026
Investigation Update: Mhamdya Nadaf’s Role in the Murder Conspiracy
Infrastructure Milestone: Trial Run on the 3.47km Karad Flyover
Marathi News Esakal
www.esakal.com